आपला जिल्हा

विजेच्या खेळखंडोबा विरोधात मंगळवारी भव्य जन आक्रोश मोर्चा

विजेच्या खेळखंडोबा विरोधात मंगळवारी भव्य जन आक्रोश मोर्चा
विजेच्या खेळखंडोबा विरोधात मंगळवारी भव्य जन आक्रोश मोर्चा
जाहिरात

Sangmner vijay kapse दि २० सप्टेंबर २०२६–संगमनेर तालुका हा मोठ्या कष्टातून विकसित व वैभवशाली ठरला आहे. मात्र पाणी पुढे नेण्यासाठी विजेचा खेळ खंडोबा केला जात असून हक्काचे पाणी व हक्काची वीज पूर्ण वेळ दाबाने मिळावी याकरता संगमनेर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचा भव्य जन आक्रोश मोर्चा मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी स 9 वा. काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

जाहिरात

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान येथील शेतकरी मेळाव्यात या मोर्चा बाबत माहिती देताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा मोठ्या कष्टातून उभा राहिला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी  भंडारदरा धरणातून तालुक्याला हक्काचे 30 टक्के पाणी मिळवले. दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व दोन्ही कालवे पूर्ण केले. आता कालवे पूर्ण होऊन पाणी आले आहे. मात्र विजेचा खेळ खंडोबा करून पाणी पुढे नेले जात आहे.

जाहिरात

पाणी पुढे नेणे म्हणजे तालुका उध्वस्त करणे आहे. तालुक्यात रात्री सहा ते नऊ या वेळेत लोड शेडिंग सुरू आहे याबाबत आपण वेळोवेळी निवेदने दिली परंतु कोणताही परिणाम झाला नाही आमच्या हक्काची अकरा तास पूर्ण दाबाने वीज व तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे ही आग्रही मागणी सर्वांची आहे आणि त्यासाठी मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता यशोधन कार्यालय प्रांगण येथून प्रांताधिकारी कार्यालयावर भ्रव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या जन आक्रोश मोर्चामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे यांच्यासह सर्वपक्षीय नेते विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक महिला उपस्थित राहणार आहेत.

तरी मंगळवारी होणाऱ्या हक्काचे पाणी व सुरळीत वीजपुरवठासाठीच्या  या भव्य जन आक्रोश मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व युवक नागरिक महिला शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात, काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, पुरोगामी व समविचारी पक्ष विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, संगमनेर तालुका कृती समिती, महिला संघटना, स्वाभिमानी संगमनेर तालुका संघटना अशा विविध संघटनांनी केले आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे