एस. एस. जी .एम. महाविद्यालयात जिल्हा विभागीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन
एस. एस. जी .एम. महाविद्यालयात जिल्हा विभागीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन
एस. एस. जी .एम. महाविद्यालयात जिल्हा विभागीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि २८ नोव्हेंबर २०२४ :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे ‘अविष्कार’ विभागीय संशोधन स्पर्धेचे आयोजन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २००६ पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी अविष्कार, अन्वेषण इत्यादी संशोधन विषयक स्पर्धांचे आयोजन केले जाते.
अविष्कार नियोजन समितीच्या २०२४-२५ संघ निवडीसाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये नियोजित जिल्हास्तरीय विभागीय संशोधक स्पर्धा एस.एस.जी.एम.महाविद्यालयात दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित केली आहे.विभागीय संशोधन स्पर्धेत महाविद्यालयातील घेतलेल्या प्राथमिक फेरीतील निवड झालेल्या संशोधन प्रकल्पांना सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील ४०महाविद्यालय सहभाग घेणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी दिली आहे.
डायरेक्टर डॉ. बी. बी. काळे (माजी संचालक सिमेट, पुणे) एम. आय. टी. पुणे यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथ शिंदे हे असणार आहे. या स्पर्धेचे संयोजन प्रा.डॉ. व्ही.बी .गाडे हे करणार आहेत.