एस जी विद्यालय कोपरगाव
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात संविधान दिन साजरा
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात संविधान दिन साजरा
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात संविधान दिन साजरा
कोपरगाव विजय कापसे दि २८ नोव्हेंबर २०२४– भारताचे संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले असुन संविधानाने आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासली असुन त्यामुळे देश एकसंघ वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील श्रीमान गोकूळचंदजी विदयालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी यांनी विदयालयात भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मे.हवालदार नितीन ठोमसे, मे. हवालदार अनिल कोल्हे, दिलीप तुपसैंदर, वंदना महानुभाव आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर कोपरगांव एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे यांनी संविधान दिना निमित्तानं सर्वाना शुभेच्छा दिल्या तर वंदना महानुभव यांनी संविधानाचे महत्व सांगितले.
आयोजित केलेल्या या कार्यक्रमात या विद्यालयात संविधान जनजागृती साठी परीपाठातुन इ.८वी च्या विद्यार्थ्यांकडून गीत, नाटीका व माहीतीपट सादर करण्यात आला. या प्रसंगी संविधान प्रतिमेचे पुजन करुन संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांनी केले तर सूत्रसंचलन कुलदीप गोसावी व आभार अनिल अमृतकर यांनी मानले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.