आपला जिल्हा

कृष्ण नामामुळेच जीवनातील अंधकार दूर होईल महंत रामगिरी महाराज

कृष्ण नामामुळेच जीवनातील अंधकार दूर होईल
महंत रामगिरी महाराज

काल्याच्या कीर्तनाने भागवत कथेची सांगता

Kopargaon vijay kapse दि २५ सप्टेंबर २०२६ –कृष्णनाम हे केवळ कंठातील माळेपुरते मर्यादित न राहता ते आचरणात उतरले, तरच जीवनातील अंधकार दूर होऊन अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होईल, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

जाहिरात

गोदावरी बायो रिफायनरी लिमिटेड, साकरवाडी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित ‘कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश’ या अभंगाच्या भावस्पर्शी निरूपणातून कृष्णभक्तीचा जागर करत काल्याच्या कीर्तनाने श्रीमद् भागवत कथेची भक्तिमय सांगता झाली.
महंत रामगिरी महाराज म्हणाले, कृष्णाला कंठीमध्ये धारण करणे म्हणजे केवळ माळ धारण करणे नव्हे; तर जीवनाच्या प्रत्येक क्षणी सदाचार धारण करणे होय. मनुष्याच्या जीवनातील अज्ञान, अहंकार, मत्सर आणि मोहाचा अंधार दूर करण्याची ताकद भगवंताच्या नामस्मरणात आहे. त्यामुळे संकटांच्या काळात परिस्थितीला दोष देण्यापेक्षा भगवंताच्या नामाचा आधार घेऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

जाहिरात

श्रीमद् भागवताचा संदेश हा समाजाला जोडणारा आणि जीवनाला दिशा देणारा आहे. भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीलांमधून भक्तीबरोबरच धर्म, कर्तव्य, प्रेम, समर्पण आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळते. कृष्णाच्या बाललीलांपासून कंसवध, गोवर्धन पूजा, गोपींची भक्ती आणि भक्तांच्या उद्धारापर्यंत प्रत्येक प्रसंगामागे मानवी जीवनाला मार्गदर्शन करणारा संदेश दडलेला आहे .
भागवत कथा ऐकून केवळ कान तृप्त होणे पुरेसे नाही; भागवताचा विचार आचरणात आला पाहिजे. नामस्मरणातून मन शुद्ध झाले, अहंकार कमी झाला आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्याची भावना निर्माण झाली, तरच भागवत श्रवणाचे सार्थक झाले, असेही महंत रामगिरी महाराज यांनी स्पष्ट केले.
काल्याच्या कीर्तनादरम्यान श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीलांचे भावपूर्ण वर्णन करण्यात आले. भक्तिरसात तल्लीन झालेल्या भाविकांनी काल्याच्या प्रसादाचा लाभ घेतला.सात दिवस चाललेल्या श्रीमद् भागवत कथेतून भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि सदाचाराचा संदेश देत अखेर कृष्णनामाच्या प्रकाशात कथेची सांगता झाली.

जाहिरात

यावेळी साथ संगत ह भ प रामभाऊ म. बर्डे, ह भ प चंद्रकांत म. सावंत शिवाजी म. ठाकरे सोपान म. बारहाते, संदीप म. वैद्य, वसंत म. भाकरे, पावडे महाराज,सुनील म. सुरभैया आदींनी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष सुहास गोडगे, उपाध्यक्ष प्रवीण विभुते, संजय शिंदे ,गणेश पाटील, रायभान गायकवाड,संजय परदेशी,
शानुल पगार, संजय टेके, नितीन पाटील,रवींद्र भोकरे, निलेश संत,काजळे,दीपक टेके, संजय कराळे, सौदागर कुलाल आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान कथेस आमदार आशुतोष काळे,आमदार विवेक कोल्हे, आमदार रमेश बोरणारे,पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे ,जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव गुळवे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गोदावरीचे दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे ,ह भ प भरत महाराज,रघुनंदनगिरी महाराज,विकास महाराज , राघवानंद महाराज यांनी भेट दिली.
या प्रसंगी मच्छिंद्र टेके,नामदेव जाधव, मधुकर टेके,सुरेश जाधव बद्रीनाथ जाधव,विजय गायकवाड,लक्ष्मण चौधरी, वाल्मीक जाधव, रावसाहेब टेके,विजयसिंह गायकवाड, शाम ठोंबरे, विशाल गोरडे ,संजय जामदार,दिगंबर जाधव,यशवंत कदम, ॲड अमोल टेके, फकीर बोरनारे,रमेश नवले,दीपक चौधरी,शरद सांगळे, दौलत वाईकर,सतीश बारहाते,अजित कोताडे, जनार्दन बर्गे,प्रमोद चौधरी,भाऊसाहेब जाधव अमोल वाळुंज,योगेश जगताप आदीसह पत्रकार जनार्दन जगताप, फकीर टेके, रोहित टेके, प्रशांत टेके तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे