आपला जिल्हा

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण करत पर्यावरण दिन साजरा

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण करत पर्यावरण दिन साजरा
समृध्दी शहर स्तर अंतर्गत बचतगट महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ७ जुन २०२५स्वीडन मधील स्टॉक होम येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्राची मानवी परिषद संपन्न झाली या दिवसाचे औचित्य साधत संपूर्ण जगभर १९७३ पासून जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जात असतो त्याच अनुषंगाने कोपरगाव नगर पालिकेचे वतीने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि ६ जून रोजी विविध उपक्रम घेत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

जाहिरात
कोपरगाव शहरातील साई सिटी मध्ये नगरपालिकेचे स्वच्छता दूत आदिनाथ ढाकणे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्याधिकारी मनोज पापडीवाल, नगर रचना अधिकारी अश्विनी पिंगळ, सहाय्यक रचनाकार किरण जोशी, करनिरीक्षक तात्याबा  राहणे, पाणीपुरवठा अभियंता रुपाली भालेराव, सिव्हिल इंजिनिअर श्रीनाथ गीते, समृद्धी शहरस्तर संघाच्या अध्यक्षा मनीषा ढवळे,संघाच्या व्यवस्थापक हर्षा पाटील, समूह संसाधन व्यक्ती हेमा तवरेज, बांधकाम लिपिक प्रेमकुमार गायकवाड, दीनदयाळ अंत्योदय योजनेचे शहर व्यवस्थापक रामनाथ जाधव यासह नगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने  उपस्थित असलेल्या महिला बचत गटाच्या महिलांच्या शुभहस्ते विविध देशी, विदेशी, औषधी झाडांचे रोपण करत त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.

जाहिरात
तसेच नगरपालिकेच्या वतीने जागतीक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या अभियानांतर्गत प्लास्टिक वापरावर निर्बंध, पर्यावरण पूरक पर्यायांचा प्रचार व प्रसार करणे, नागरिकांचे प्लास्टिक न वापरण्यासाठी जनजागृती करणे तसेच शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देत आपल्या कोपरगाव शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी कृतीशील योगदान देण्याचे आवाहन  फलकाद्वारे करत जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच महिला बचत गटाच्या महिलांनी अथक परिश्रम घेतले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे