आपला जिल्हा

मांगुर माशाने भरलेला ट्रक पोलिसांनी केला जप्त

मांगुर माशाने भरलेला ट्रक पोलिसांनी केला जप्त
मांगुर माशाने भरलेला ट्रक पोलिसांनी केला जप्त
जाहिरात

राहाता विजय कापसे दि ६ जुन २०२५- अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राहाता पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या नाकाबंदी मध्ये देशात प्रतिबंधित असलेल्या मांगुर जातीचे क्लारिस  गॅरीपिन्स प्रकारातील भरलेला नाकाबंदी दरम्यान पकडुन केला गुन्हा दाखल झाल्याने परिसरातील चर्चेचा विषय ठरला आहे.

जाहिरात

सविस्तर  वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ गार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतुक कारवाई अनुषंगाने राहाता पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण सांळुखे, सफो प्रभाकर शिरसाठ, पोहेकॉ विशाल पंडोरे, पोकॉ अनिल गवांदे, पोना बिनोद गंभीरे व चापोहेकॉ शेषराव अनारसे असे चितळी चौक येथे गुरुवार दि ५ जुन २०२५ रात्री ११ ते शुक्रवार दि ६ जून २०२५ सकाळी ६ वाजेपर्यंत  नाकाबंदी करीत असतांना एक पांढरे रंगाचा अशोक लिलैंड कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे २५ जी ए ६९५८ असा अहिल्यानगर कडुन शिर्डीच्या दिशेने संशयीतरित्या दिसून आल्याने त्यास चितळी चौक येथे थांबवून खात्री केली असता त्यात देशात प्रतिबंधीत असलेले मांगूर जातीतील  प्रकरातील मासेंनी भरलेला ट्रक मिळून आल्याने ट्रक चालक यांस त्याबाबत विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदर मासेंबाबत खात्री करणेकरीता अहिल्यानगर येथील सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी प्रतिक्षा सुधाकर पाटेकर  यांना बोलावुन घेवुन त्यांचे मार्फतीने खात्री केली असता सदर ट्रक मध्ये सुमारे ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सुमारे  ४ हजार ६०० किलो वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगुर जातीचे (क्लारिस  गॅरीपिन्स) प्रकरातील मासे मिळुन आल्याने

जाहिरात

पंचनामा करुन सदरचा पर्यावरणाला धोका निर्माण करुन तसेच लोकांनी खाल्यास मोठ्या स्वरुपात गंभीर आजार व दुखापत होण्याची जाणीव असतांना यातील आरोपी  सादाव हकिम खान वय २५ वर्षे रा. पुनसवास वार्ड क्रमांक १४ नेताजी धरमपुरी ता. धरमपुरी जि. धार राज्य मध्यप्रदेश, मांगीलाल नाथुलाल कहार वय ३५ वर्षे रा. राजगड ता. सरदारपुर जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश,नरसिंहा मुंग्रा रा. भिगवण जिल्हा पुणे व कमल चौहान रा राजगड जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश यांच्याविरुध्द गुन्हा रजि. क्रमांक २४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २२३,२७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनीयम २००६ चे कलम ५८ व ५९ व पर्यावरण (संरक्षण) अधिनीयम १०८६ चे कलम ३,५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात गौतम
सदरची कौतुकास्पद कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे श्रीरामपूर परिमंडळ व  उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने  शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण सांळ्खे, सफौ प्रभाकर शिरसाठ, पोहेकॉ  विशाल पंडोरे, पोकॉ अनिल गवांदे, पोना विनोद गंभीरे व चापोहेकॉ शेषराव अनारसे आदी पोलिसांनी  केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे