राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत विविध विषयांवर केली चर्चा
राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत विविध विषयांवर केली चर्चा
जाहिरात
अहिल्यानगर विजय कापसे दि ७ जुन २०२५– महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना पदाधिकारी व सभासद यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची भेट घेऊन स्वागत ,सत्कार व करत महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच ग्रामपंचायत अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावामध्ये कार्यरत राहून स्थानिक स्वराज्य संस्थेतील शेवटच्या ग्रामपंचायत स्तरामधून विकास कामाबरोबर शासनाच्या विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून लाभ द्यावा व जनतेच्या अडचणी समजून सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अभिलेख अद्यावत ठेवण्याबाबत सूचना दिल्या यावेळी संवर्गाकडून आपण व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील अशी शिष्टमंडळाने अश्वस्त केले.
जाहिरात
या चर्चेदरम्यान संघटना शिष्टमंडळाने न्यायालयीन निकालावर आधारित संवर्गांच्या वेतन त्रुटी व खुल्लर समितीने केलेल्या शिफारशी बाबत सविस्तर चर्चा केली असता या चर्चेदरम्यान महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक २४ सप्टेंबर २०२४ नुसार व महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील शासन निर्णय दिनांक २ जुन २०२५ सुधारित शासन निर्णय यांची सांगड घालून कालावधी व पात्रतेनुसार १ जानेवारी २०२६ पासून काल्पनिकरित्या ग्रामपंचायत अधिकारी या पदास* सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १० वर्षाच्या सेवेनंतर प्रथम लाभ विस्तार अधिकारी एस- १४, २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गटविकास अधिकारी एस-१६, ३० वर्षाचे सेवेनंतर तिसरा लाभ गटविकास अधिकारी एस – २० याप्रमाणे गेल्या २ वर्षापासून दिवसापासून प्रलंबित असलेल्या १० ,२० व ३० वर्ष आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभाचे आदेश काढण्यात यावे अशी विनंती केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक सहमती दाखव सदर प्रलंबित विषयाबाबत विषयाबाबतचे आदेश लवकरच निर्गमित येतील असे सांगितले .जाहिरात
यावेळी शैलेश मोरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला व शासन निर्णयातील तरतुदी बाबत चर्चा करून लागू करण्याबाबत विनंती केली.जाहिरात गौतम
यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्यसचिव हरिश्चंद्र काळे , जिल्हाध्यक्ष सुनील राजपूत ,जिल्हा सचिव शशिकांत नरोडे, नाशिक विभागीय कार्याध्यक्ष सुरेश सौदागर, छत्रपती शिवाजी राजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन संजय गवळी, पारनेर तालुका अध्यक्ष बळीराम सेटवाड, सचिव शरदभाऊ गायकवाड, अहिल्यानगर तालुकाध्यक्ष श्रीपाद फलके ,सचिव प्रवीण पवार, जेष्ठ ग्रामपंचायत अधिकारी अर्जुन साबळे ,सुनील शेलार, राजेंद्र विधाटे, सुनील दुधाडे यासह सभासद बांधव उपस्थित होते.