आपला जिल्हा

मानेला कोयता लावुन केलेल्या दरोड्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल पोलिसांनी केले फिर्यादीला परत

मानेला कोयता लावुन केलेल्या दरोड्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल पोलिसांनी केले फिर्यादीला परत
मानेला कोयता लावुन केलेल्या दरोड्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल पोलिसांनी केले फिर्यादीला परत
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ जुन २०२५–  संदिप रामदास बोळीज वय वर्ष ४५, रा. समता नगर, कोपरगाव यांनी दि ७ मे २०२५ रोजी कोपरगाव तालुका पोस्टेला गुरन १४०/२०२५ बीएनएस क. ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्ह्याची फिर्याद दिली होती की, दि ६ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उक्कडगाव ते कोपरगाव रोडवर तिळवणी गावचे आसपास, मार्केट कमिटी जवळ एकुण ५ आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नी चित्रा बोळीज असे त्यांच्या मोटर सायकलने वैजापुर कडुन कोपरगावकडे जात असतांना त्यांना अडवुन त्यांच्या जवळुन बळजबरीने मानेला कोयता लावुन

हस्तगत केलेला व फिर्यादीला परत दिलेला मुद्देमाल
 १) २१ हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन वाट्या व १३ मनी जु.वा.की. अंदाजे (२.१२० ग्रॅम) वजनाचे प्रति ग्रॅम १० हजार रुपये अंदाजे
२) ७ हजार ७००रुपये किंमतीचे  एक सोन्याचे कर्णफुल (टॉप्स) ०.७८० ग्रॅम वजनाचे.
३) २२.२०० रुपये किंमतीचे एक सोन्याचे वेल २.२०० ग्रॅम वजनाचे.
४) ९.४०० रुपये किंमतीचे एक सोन्याचे लटकन ०.९३० ग्रॅम वजनाचे, जु.वा.कि.अं.
५) १० हजार रुपये किंमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल 

काढुन घेतला होता अशी फिर्याद कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन ला दाखल फिर्यादी नुसार गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सुचाना व मार्गदर्शनाने पोलिसांनी तपास सुरु केला होता.

जाहिरात

सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अहिल्यानगर च्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधाराने राहुल केदारनाथ लोहकणे, वय वर्ष २० रा. कोकमठाण, ता. कोपरगाव, कुणाल अनिल चंदनशिवे, वय वर्ष १९, रा. संवत्सर, ता. कोपरगाव, निलेश बाळासाहेब भोकरे, वय वर्ष १९, रा. संवत्सर, ता. कोपरगाव, प्रमोद कैलास गायकवाड, वय वर्ष १९  रा.संवत्सर ता. कोपरगाव व एक अल्पवयीन आरोपी असे ५ आरोपी निष्पन्न करुन त्यांच्याकडुन चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कारवाई कामी दिला होता.

जाहिरात

 पुढील तपासात पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून मुद्देमालाची फिर्यादी व साक्षिदार यांच्याकडून ओळख पटवून सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांचाच आहे अशी खात्री केली आहे.

जाहिरात गौतम

त्यानंतर आज दि १३ जुन २०२५ रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदिप कोळी व पोलीस उप-निरीक्षक कमलाकर चौधरी यांनी दोन पंचांसमक्ष फिर्यादी व साक्षिदार यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत केला असून सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक  वैभव कलुबर्मे व  उप-विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोहेकॉ  गणेश लोंढे, पोहेकॉ  फुलकान शेख, पोकॉ रणजित जाधव, पोकॉ विशाल तनपुरे, पोकॉ रमिजराजा अत्तार, पोकॉ प्रशांत राठोड, पोकॉ मेघराज कोल्हे सर्व नेमणुक  स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर तसेच कोपरगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक संदिप कोळी, पोलिस उपनिरीक्षक, कमलाकर चौधरी, पोहेकॉ मधुसुदन दहिफळे, पोकॉ किसन सानप अशांनी केली आहे.

जाहिरात
हस्तगत केलेला व फिर्यादीला परत दिलेला मुद्देमाल
 १) २१ हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन वाट्या व १३ मनी जु.वा.की. अंदाजे (२.१२० ग्रॅम) वजनाचे प्रति ग्रॅम १० हजार रुपये अंदाजे
२) ७ हजार ७००रुपये किंमतीचे  एक सोन्याचे कर्णफुल (टॉप्स) ०.७८० ग्रॅम वजनाचे.
३) २२.२०० रुपये किंमतीचे एक सोन्याचे वेल २.२०० ग्रॅम वजनाचे.
४) ९.४०० रुपये किंमतीचे एक सोन्याचे लटकन ०.९३० ग्रॅम वजनाचे, जु.वा.कि.अं.
५) १० हजार रुपये किंमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल 
मुद्देमाल परत देताना पोलिस निरीक्षक कोळी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे