संगमनेर
समिती कशाला ? सरसकट कर्जमाफीची घोषणा करा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
समिती कशाला ? सरसकट कर्जमाफीची घोषणा करा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर विजय कापसे दि १४ जुन २०२५– बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका, ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे, सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी व महसूल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.



