आपला जिल्हा

डॉ.कुणाल घायतडकर राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

डॉ.कुणाल घायतडकर राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
डॉ.कुणाल घायतडकर राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२५गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या वतीने कोपरगाव येथील प्रसिद्ध डॉ. कुणाल अशोकराव घायताडकर यांचा आदर्श पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते समाज भूषण पुरस्कार २०२५ देऊन गौरवण्यात आले.

जाहिरात

रविवार दि १५ जुलै रोजी अहिल्यानगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा राज्याचे भूषण दोनवेळा भारत सरकार कडून राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम व दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते तसेच  महाराष्ट्र सरकार तर्फे  विशेष पुरस्काराने गौरविण्यात आलेले छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते

जाहिरात

तसेच सरपंच सेवा संघाचे मार्गदर्शक यादवराव पावसे, प्रसिद्ध युवा महिला कीर्तनकार हभप जयश्रीताई शिंकाडे महाराज,संघाचे संस्थापक तथा सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार,राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, संघटक रविंद्र पवार,विश्वस्त सुजाता कासार,कार्याध्यक्ष रवींद्र पावसे आदी प्रमुख मान्यवरांच्या तसेच सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

जाहिरात गौतम

कोपरगाव शहरातील डॉ घातडकर पाटील डेंटल हॉस्पिटल व अशोकराव घायतडकर पाटील सेवाभावी संस्थेमार्फत डॉ.कुणाल घायतडकर व त्यांच्या पत्नी डॉ.भाग्यश्री घायताडकर हे दांपत्य गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवत होत असून त्यांनी आजपर्यंत वेगवेगळी आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे, दंत तपासणी शिबिरे, मूख कॅन्सर तपासणी शिबिरे,व्यसन मुक्ती अभियान, वृक्षारोपण, वेगळे धार्मिक कार्यक्रम आदि सामाजपयोगी विधायक उपक्रम राबविली आहे तर कोरोना काळात देखील त्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोविड सेंटर मध्ये निरंतर सेवा दिली आहे. तसेच  ते दरवर्षी २६ जानेवारी ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती या कालावधीत त्यांचा हॉस्पिटलमध्ये दिवसभर मोफत दंत तपासणी व अल्प दरात उपचार शिबिरे राबवत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा अनेक संस्था मान्यवरांकडून गौरव करण्यात आला आहे तर कोरोना महामारीत केलेल्या विशेष कार्याबद्दल तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता, त्यांना  सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे