कोपरगाव पोस्ट ऑफिसतर्फे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर; ७२ पिशव्यांचे संकलन
कोपरगाव पोस्ट ऑफिसतर्फे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर; ७२ पिशव्यांचे संकलन
कोपरगाव पोस्ट ऑफिसतर्फे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर; ७२ पिशव्यांचे संकलन

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२५– जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून कोपरगाव पोस्ट ऑफिस व गोकुळधाम गौरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास कोपरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सुमारे ७२ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक व आर्थिक तज्ज्ञ कैलास ठोळे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितले की, “पोस्ट खात्यात सध्या सुरु असलेला आमूलाग्र बदल ही नव्या युगाची क्रांती असून येणारा काळ हा पोस्ट खात्यासाठी सुवर्णकाळ ठरेल. पोस्टाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून विश्वास निर्माण करणारे कर्मचारी हे खऱ्या अर्थाने बदलाचे शिल्पकार आहेत.”

या वेळी कोपरगाव डाक विभागाचे डाकनिरीक्षक अनंत सोनवणे, पोस्टमास्टर राजेश नेतनकर, गोकुळधाम गौरक्षा केंद्राचे अध्यक्ष प्रवीण पाटणी, तसेच प्रसिद्ध उद्योजक अमितशेठ लोहाडे उपस्थित होते. सर्वांनी उपस्थित रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या समाजासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

या शिबिरात रक्त कल्याण रक्तपेढी, नाशिक येथून आलेल्या पथकाने रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. श्रीरामपूर डाक विभागाचे डाक अध्यक्ष उमेश जनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी होण्यासाठी डाक आवेक्षक संजय ढेपले, अर्जुन मोरे,ॲड.पत्रकार साईप्रसाद डोखे, पत्रकार आर.आर.गायकवाड बापूसाहेब चव्हाण,विजय जोर्वेकर, सोमनाथ तांगतोडे, अशोक अनाप, कैलास हाडोळे, ज्ञानदेव पगारे,गौरव वाघ, विशाल गवळी,तसेच कोपरगाव सब डाक विभागातील सर्व पोस्ट ऑफिसचे कर्मचारी, पोस्टमन, ब्रांच पोस्टमास्तर यांनी सक्रिय सहभाग घेतला.




