आपला जिल्हा

हर्षा पाटील राज्यस्तरीय महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

हर्षा पाटील राज्यस्तरीय महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित
हर्षा पाटील राज्यस्तरीय महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२५गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या वतीने कोपरगाव येथील महिला बचत गट समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक हर्षा बाळकृष्ण पाटील यांना आदर्श पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय महिला नारीशक्ती सन्मान २०२५ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

रविवार दि १५ जुलै रोजी अहिल्यानगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा राज्याचे भूषण दोनवेळा भारत सरकार कडून राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम व दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते तसेच  महाराष्ट्र सरकार तर्फे  विशेष पुरस्काराने गौरविण्यात आलेले छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच सरपंच सेवा संघाचे मार्गदर्शक यादवराव पावसे,प्रसिद्ध युवा महिला कीर्तनकार हभप जयश्रीताई तिंकाडे महाराज,संघाचे संस्थापक तथा सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार,राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, संघटक रविंद्र पवार,विश्वस्त सुजाता कासार,कार्याध्यक्ष रवींद्र पावसे आदी प्रमुख मान्यवरांच्या तसेच सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

हर्षा पाटील या महिला बचत गटासाठी कार्यरत असलेल्या समृद्धी शहर स्तर संघ या संस्थेच्या कोपरगावच्या व्यवस्थापक असून त्यांनी गेल्या ८ ते १० वर्षापासून कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करत अनेक बचत गट सुरू केले असून या बचत गटांना समृद्धी शहर स्तर या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय बँकेमार्फत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्तपुरवठा मिळवून दिला असून आज रोजी त्यांनी स्थापन केलेल्या बचत गटांमधील अनेक महिलांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करत आपल्या कुटुंबाच्या प्रगतीची वाटचाल सुरू केली असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा राज्य पत्रकार संघ कोपरगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनी विशेष सन्मान केला होता.त्यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय महिला नारी शक्ती पुरस्काराने गौरवण्यात आल्याने त्यांनी महिलांच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे फलित असून त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे