कोपरगाव विजय कापसे दि ३ जुलै २०२५— निसर्ग वाचवायचा असेल तर वृक्ष लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे,” हा विश्वास ठेवत ब्राह्मणगाव येथील भागिनाथ बाबासाहेब आसने या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या पर्यावरण संवेदनशीलतेचा अनोखा परिचय दिला आहे.
जाहिरात
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्यांवर एक उपाय म्हणून निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे आणि त्याचे ऋण फेडण्याचे कार्य भागिनाथ आसने हे गेली अनेक वर्षे करत आहेत. त्यांनी आपल्या दैनंदिन शेतीच्या व्यापातून वेळ काढत वेगवेगळ्या देशी झाडांच्या बिया जसे की सीताफळ, आंबा, करंज आणि बकाण यांचा सुद्धा सातत्याने संग्रह केला आहे.जाहिरात
या बिया दरवर्षी सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या नर्सरीसाठी देण्यात येतात. यावर्षी सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त या मौल्यवान बिया वनक्षेत्रपाल . एन. जे. रोडे यांच्याकडे सुपूर्त केल्या.जाहिरात गौतम
सामाजिक वनीकरण विभाग विविध योजनांच्या माध्यमातून गावांतील मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करतो आणि त्या झाडांचे संगोपन करतो. मात्र, त्यासाठी बिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बियांअभावी अनेक वेळा नर्सरी तयार करताना अडचणी येतात. अशा वेळी भागिनाथ आसने यांच्यासारख्या संवेदनशील नागरिकांचा पुढाकार खरोखरच प्रेरणादायक ठरतो.जाहिरात
शेती करतानाही पर्यावरणाचे भान ठेवून समाजासाठी काहीतरी देणे लागते, या भावनेतून त्यांनी हे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांचे हे योगदान इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरावे, अशीच अपेक्षा आहे.