आपला जिल्हा
महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका
महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका

संगमनेर विजय कापसे दि २५ जुलै २०२५– महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यांना काही दिले नाही. कर्जमाफी बाबत शेतकऱ्यांना फसवले. आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत.मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती ही सत्तेसाठी एकत्र आली असून महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे.







