स्वातंत्र्यदिनानिमित्त तिळवणी गावातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
स्वातंत्र्यदिनानिमित्त तिळवणी गावातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
स्वातंत्र्यदिनानिमित्त तिळवणी गावातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कोपरगाव विजय कापसे दि २० ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्यदिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील तिळवणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्मृतीशेष दगडू काळू पगारे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर दगडू पगारे व शांताबाई दगडू पगारे यांच्यातर्फे प्रत्येकी सहा याप्रमाणे सातशे वह्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वर दगडू पगारे यांनी वडिलांचा वसा व वडिलांचा वारसा विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी हजारो रुपयांची देणगी देऊन अविरत चालू ठेवला आहे दरवर्षी शाळेसाठी दरवर्षी हजारो रुपयांची देणगी वस्तू रूपाने आणि शैक्षणिक साहित्यद्वारे त्यांच्यामार्फत देण्यात येते.

याप्रसंगी गावचे सरपंच गोविंद बाबा पगारे, आण्णासाहेब शिंदे, नाना गायके ,सुदाम शिंदे ,संदीप शिंदे ,पोपट शिंदे,विनू परदेशी ,लक्ष्मण वाघ ,निलेश वाघ राजेंद्र वाघ, बाळासाहेब वाघ , राजाराम शिंदे, जालिंदर पगारे, चंद्रभागाबाई पगारे ,शांताबाई पगारे, माजी सरपंच राजश्रीताई बागुल , दीपक पगारे , जालिंदर चक्के उपस्थित होते.




