आपला जिल्हा
संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा अखेर काढता पाय
संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा अखेर काढता पाय
संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा अखेर काढता पाय
राज्यस्तरावर ओळख निर्माण केलेले व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची संगमनेर नगरपरिषदेत काटेकोर शिस्त प्रस्थापित करण्यासाठी नियुक्ती झाली होती. मात्र त्यांनीही बदललेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन अखेर संगमनेर सोडले.

यापूर्वी तहसीलदारांनीही थेट तीन महिन्यांची रजा घेऊन संगमनेरातून पाय काढला होता. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनेच ते पुन्हा कामावर रुजू झाले. तालुका पोलीस निरीक्षकांना पहिल्याच दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींनी “खरपूस समाचार” दिल्याने ते किती मनापासून काम करत असतील, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आता तर उपविभागीय पोलीस अधिकारीदेखील बदलीच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे.
या घटनांमुळे सर्वात मोठी भीती आता खरी ठरू लागली आहे, संगमनेरात चांगले अधिकारी येणारच नाहीत! राजकीय हस्तक्षेप, दबाव व चुकीची कामे करवून घेण्याची प्रवृत्ती बळावत असल्याने संगमनेरच्या “सुसंस्कृत ओळखीवर” प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. थोडक्यात, संगमनेरची जपलेली शैक्षणिक, सामाजिक आणि सुसंस्कृत परंपरा धोक्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाला आळा घालण्यासाठी सुज्ञ नागरिकांनीच पुढाकार घेणे, ही वेळेची खरी गरज आहे.
