आर जे एस फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मसी दिन साजरा
आर जे एस फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मसी दिन साजरा
कोपरगाव विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२५:- आरजेएस शिक्षण संस्था संचलित राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मसी दिनानिमित्त फार्माविक चे आयोजन करण्यात होते. या उपक्रमाचे उद्घाटन छ. संभाजीनगरचे मानव संसाधन संचालक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. “मेडिकल कोडींग : फार्मसी क्षेत्रातील सुवर्णसंधी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते.जाहिरात
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवीवर समाधान मानणे पुरेसे नसून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची गुणवत्ता कशी वाढवली जाईल या पार्श्वभूमीवर या व्याख्यानमालेचे आयोजन आरजेएस फाउंडेशनचे चेअरमन चांगदेव कातकडे यांच्या संकल्पनेतून व प्राचार्य डॉ.नितीन जैन यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.या व्याख्यानासाठी छ. संभाजीनगर येथील
जीईबीबीएस हेल्थकेअर सोल्युशन मानव संसाधनचे संचालक मिलिंद कुलकर्णी व सिनियर मॅनेजर प्रदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जाहिरात
त्यांनी विद्यार्थ्यांना मेडिकल कोडिंग म्हणजे काय, त्याचे वाढते महत्त्व, नोकरीच्या संधी, करिअरची दिशा तसेच या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक कोर्सेस याविषयी सविस्तर माहिती दिली. मिलिंद कुलकर्णी यांनी जागतिक स्तरावरील हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये मेडिकल कोडिंगची गरज, अचूक माहिती व्यवस्थापनाचे महत्त्व व करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले. तर प्रदीप जाधव सर यांनी सातत्य, स्थिरता व कठोर परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश मिळवावे असे आवाहन केले. तसेच प्रदीप जाधव यांनी मेडिकल कोडिंग ही आरोग्यसेवा क्षेत्रातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यासाठी आवश्यक पूर्वअटी, शब्दसंग्रहाचे ज्ञान तसेच रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट (RCM) समजून घेणे गरजेचे आहे.अमेरिकेतील आरोग्य विमा कंपन्या, मेडिकल कोडिंगची प्रक्रिया,त्यातील विशेष शाखा व प्रमाणपत्रे यांचा अभ्यास केल्यास या क्षेत्रातीलकरिअरच्या संधी वाढतात.जाहिरात
भविष्यातील प्रवाह लक्षात घेऊन मेडिकल कोडिंग मधील कंपन्या व करिअर ग्रोथ मॅप विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतात याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जैन, उपप्राचार्य डॉ. उषा जैन, प्रसिद्ध उद्योजक विजय कडू, डिप्लोमा विभागप्रमुख स्मिता शेटे, डॉ.प्रा.जाधव, डॉ.आगलावे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील आधुनिक कौशल्य आत्मसात करून व्यावसायिक क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. नितीन जैन यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.लासुरे मॅडम,प्रा.चौधरी मॅडम प्रा. लोखंडे मॅडम यांनी आयोजन केले होते.