आपला जिल्हा

गणेश उत्सव हे आनंदाचे पर्व निसर्गाशी नाते सांगणारे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

गणेश उत्सव हे आनंदाचे पर्व निसर्गाशी नाते सांगणारे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

गणेशोत्सवात डी जे व लेझर किरणांचा वापर टाळा : पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करा

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २८ ऑगस्ट २०२५गणेश उत्सव हा आनंदाचा व श्रद्धेचा विषय आहे. हा सणांचा काळ आनंदाचे पर्व असून या काळात आरोग्याची हानी होणार नाही याकरता डीजे, लेझर किरण व गुलालाचा वापर टाळून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रभा निवासस्थानी गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी समवेत सौ.कांचनताई थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ.वर्षा तांबे,विजय राहणे, शरद बटवाल,बाबासाहेब कडनर, नितीन अभंग, ज्ञानेश्वर राक्षे यांच्यासह संगमनेर शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव आणि गणेश उत्सव सुरू झाले. सर्वांनी एकत्र येऊन हे उत्सव आनंदाने साजरे करायचे आहे. खरे तर हे आनंदाचे पर्व आहे. गणेश उत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा विषय आहे. मात्र या काळामध्ये आरोग्याची हानी होणार नाही ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

जाहिरात

विशेषता डीजेचे आवाजाने मोठ्या प्रमाणात शरीराचे नुकसान होते. त्याचप्रमाणे लेझर किरणांनी डोळ्यांचे नुकसान होते. गुलालने फुफुसाला त्रास होतो. त्यामुळे तरुणांनी यांचा वापर टाळला पाहिजे. गणेश उत्सव हे निसर्गाशी नाते सांगणारा उत्सव आहे. त्यामुळे आपण आनंद साजरा करताना पर्यावरण पूरक गणेश उत्सव कसा होईल ही काळजी घ्यावी. याचबरोबर या आनंद काळामध्ये नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठी नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा आहे. यामध्ये लहान थोर गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नाही. एकत्र येण्याची ही मोठे माध्यम असून सर्व धर्म समभाव जोपासण्याची परंपरा गणेशोत्सवाच्या काळामध्ये सर्वांनी जोपासली पाहिजे.याचबरोबर आनंद साजरा करताना युवकांनी अति उत्साह टाळा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे व डॉ.मैथिलीताई तांबे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी शहरातील कार्यकर्ते युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे