अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्येडिजिटल युगातील पालकत्वाचा नवा दृष्टिकोन या विषयावर डॉ. वनिता कर्पे यांचे व्याख्यान
अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्येडिजिटल युगातील पालकत्वाचा नवा दृष्टिकोन या विषयावर डॉ. वनिता कर्पे यांचे व्याख्यान
जाहिरात
संगमनेर विजय कापसे दि १७ मार्च २०२६– माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रविवारी दिनांक १५ मार्च २०२६ रोजी पालकांसाठी एक विशेष उद्बोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. वनिता कर्पे (एम.डी. पीडीएट्रिक) यांनी सकारात्मक पालकत्वाचा प्रभाव या विषयावर पालकांशी संवाद साधला.
जाहिरात
आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात मुलांचे संगोपन करताना पालकांसमोर अनेक नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास, व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे, मुलांचे आरोग्य आणि पालकांशी असणारे नाते अधिक सुदृढ करणे या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुनीलाकुमारी प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल प्राचार्या (सिन्नर) यांनीही मुलांशी संवाद साधून मुलांच्या गुणांना ओळखून त्यांना कसे प्रोत्साहन पालकांनी व शिक्षकांनी दिले पाहिजे याचे उद्बोधन केले. या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य आशिष कुमार, सुदर्शन डंग विद्यानगर शाळेच्या प्राचार्या, तसेच सुनीलाकुमारी प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या (सिन्नर ). सर्व विभाग प्रमुख, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे योगदान महत्वपूर्ण ठरले
जाहिरात
.
यावेळी डॉ. कर्पे यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाकडे लक्ष देणे. व्यायाम व खेळ खेळण्यास प्रोत्साहन देणे तसेच मुलांना पुरेशी झोप किती आवश्यक आहे हे त्यांनी पालकांना समजावून सांगितले. तसेच यावेळी पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिले.
जाहिरात
या व्याख्यानात सौ सुदर्शन डंग विद्यानगर शाळेतील प्राचार्या यांनी पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करताना छोट्या मुलांशी प्रेमाने व संयमाने वागावे तसेच चांगल्या सवयी आणि संस्कार शिकवावेत पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये चांगला संवाद असावा असे पालकांना मार्गदर्शन केले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री मा. नामदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ पाटील, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, संस्थेच्या व्यवस्थापकिय विश्वस्त शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व्यवस्थापक प्राचार्य व्हि. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ जे. बी. गुरव, प्राचार्य आशिष कुमार यांनी या कार्यक्रमाचे अभिनंदन केले.