आपला जिल्हा

नागरीकांचे दैनंदीन जीवन सुरळीत करून देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

नागरीकांचे दैनंदीन जीवन सुरळीत करून देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

नागरीकांचे दैनंदीन जीवन सुरळीत करून देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

राहाता विजय कापसे दि ३० सप्टेंबर २०२५- पाण्यामुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरीकांचे दैनंदीन जीवन सुरळीत करून द्यावे.ज्या रस्त्यांचे प्रश्न प्रशासकीय कारणाने प्रलंबित आहे त्याबाबत पाणी ओसरल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

जाहिरात

मंत्री विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यातील पिंप्रिनिर्मळ,अस्तगाव एकरूखे चितळी पिंपळवाडी या गावांना भेटी देवून पूराने नूकसान झालेल्या शेती पिकांची तसेच वाड्या वस्त्यांपर्यत जाणार्या रस्त्यांची पाहाणी केली.महापूर आल्याने बहुतेक गावातील रस्ते खरडून गेलै आहेत तर काही ठिकाणी पाण्यामुळे ग्रामस्थांची वहीवाटच थांबून गेल्याचे चित्र पाहाणी दोर्यातून दिसून आले.

जाहिरात

पाणी साठलेल्या ठिकाणी नळ्यांची उपलब्धता करून देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना दिल्या.अनेक ठिकाणी रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणाच्या तक्रारी समोर आल्या आहेत.याबाबत मंत्री विखे पाटील यांनी ही अतिक्रमण तातडीने काढून टाकण्याबाबत कारवाई करावी.

अनेक रस्त्याच्या बाबतीत प्रशासकीय स्तरावर काही प्रश्न प्रलंबित आहेत.पाणी ओसरल्यानंतर आशा रस्त्यांची तातडीने मोजणी करून हे प्रश्न निकाली काढावेत.

जाहिरात

शेती पीकांच्या बाबतीत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.पाऊस कमी होताच पंचनामे करण्याच्या प्रक्रीयेला गती देण्याचे त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले.

राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कटीबध्द असून पंचनामे तसेच झालेल्या नूकसानीचे आकडेवारी समोर आल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय करता येईल.

जिल्ह्यात ३लाख शेकर्याना या नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे.२लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधीत झाले असून,८५० महसूल मंडळात या पावसाची कमी अधिक प्रमाणात तीव्रता होती. शेवगाव पाथर्डी तालुक्यात दोनदा आलेल्या नैसर्गिक संकटामुळे नूकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली.

राहाता तालुक्यात ४०हजार हेक्टर क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे.प्रशासानातील सर्वच विभागांच्या अधिकार्यांनी संकटाची तीव्रता लक्षात घेवून केलेल्या यशस्वी चांगल्या आपत्कालीन व्यवस्थापनामुळे नागरीकांचे स्थलांतर करता आले.एक घटना वगळता तातडीच्या उपाय योजनामुळे जीवीत हानी टाळण्यास मोठी मदत झाल्याचे मंत्री विखे सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे