आपला जिल्हा

रविवारी सायखिंडी येथे दंडकारण्य अभियानाचा आनंद मेळावा; लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांची उपस्थिती

रविवारी सायखिंडी येथे दंडकारण्य अभियानाचा आनंद मेळावा; लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांची उपस्थिती
रविवारी सायखिंडी येथे दंडकारण्य अभियानाचा आनंद मेळावा; लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांची उपस्थिती
जाहिरात

संगमनेर  प्रतिनिधी दि २२ नोव्हेंबर २०२५-  हरितसृष्टीच्या संवर्धनासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा 20 वर्षीचा आनंद मेळावा रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता सायखिंडी येथे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सौ.दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

जाहिरात
दंडकारण्य अभियानाच्या आनंद मेळाव्या बाबत अधिक माहिती देताना सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व सेवाभावी संस्था व नागरिकांनी सहभाग घेऊन हे अभियान लोक चळवळ बनवली. यामुळे अनेक उघडी बोडके डोंगर आता हिरवे दिसू लागली असून तालुक्यात हिरवाई निर्माण झाली आहे.

जाहिरात

यावर्षीच्या अभियानाचा आनंद मेळावा उद्या रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वा. सायखिंडी येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या क्षेत्रामध्ये होणार आहे. यावेळी मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्य समन्वयक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲड माधवराव कानवडे, डॉ.जयश्रीताई थोरात उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी रणजितसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, सुधाकर जोशी,संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे,आर.बी.रहाणे,रामहरी कातोरे,सिताराम राऊत, विष्णुपंत रहाटळ, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, डॉ.मैथिलीताई तांबे, सौ.प्रमिला अभंग, सौ.अर्चनाताई बालोडे,बी.आर. चकोर,प्रा.बाबा खरात, राजेंद्र कडलक, राजेंद्र गुंजाळ, हौशीराम सोनवणे, मोहनराव करंजकर, विलास वरपे, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड,आनंद वर्पे, निखिल पापडेजा, हैदर आली, जावेद शेख,गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, दंडकारण्य अभियानाचे समन्वयक दशरथ वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ.सुजित खिलारी,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघ,प्रा.जी.बी.बाचकर यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या आनंद मेळाव्यासाठी संगमनेर मधील सर्व पर्यावरण प्रेमी, नागरिक बंधू, महिला, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दंडकारण्य अभियान समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे