आपला जिल्हा

नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरणनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन

नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरणनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन
नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरणनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ जुन २०२६- दूध उत्पादकांची कामधेनू म्हणून सर्वपरिचित असलेल्या गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोपरगावचे संस्थापक लोकनेते नामदेवरावजी परजणे पाटील अण्णा यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रामीण भागातील मुला मुलींना शिकवून देश विदेशात नाव कमवावे आपले व गावाचे नाव उज्वल करावे असा मौखिक सल्ला  विद्यार्थ्यांना देणारे आण्णाचे स्वप्न  उराशी बाळगत गेल्या १५ ते १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पुण्यस्मरण निमित्त विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात येत असते याही वर्षी गुरुवारी १८ जून ते शनिवार दि २० जून या पर्व काळात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी दिली आहे.

जाहिरात
नामदेव परजणे पाटील महाविद्यालय संवत्सर येथे दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि जुन रोजी ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथील वारकरी भूषण ह.भ.प उमेश महाराज दशरथे यांचे ते ज्ञान पै गा बारवे या विषयावर प्रवचन होणार आहे.

जाहिरात
 तर शुक्रवार दि १९ जून रोजी जीवनातील संस्काराचे महत्व या विषयावर नाशिक येथील आय.ए. एस अधिकारी सुनील कडासने यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच शनिवार दि २० जून रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील प्रसिद्ध गीतकार, लेखक,कवी,पटकथाकार प्रा. प्रवीण दवणे यांचे नवी पिढी घडवताना या विषयावर व्याख्यान होणार आहे तरी जास्तीत जास्त युवक युवतींनी तसेच ग्रामस्थांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त परजणे पाटील परिवार व समस्त संवत्सर गावच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे