आपला जिल्हा
गोदावरी दूध संघांच्या विविध प्रकल्पांचा रविवारी शुभारंभ

संस्थापक नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजन

Kopargaon vijay kapse दि १६ जुन २०२६–शेतकरी दूध उत्पादकांची कामधेनू म्हणून सर्व परिचित असलेल्या गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ कोपरगाव यांचे संस्थापक नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरण निमित्त गोदावरी बायफ पशुरोग निदान प्रयोग शाळेत नव्याने सुरू होत असलेल्या अनुवंशिक गुणवत्ता तपासणी व संकरित गाई मधील देशी व विदेशी रक्तांचे अचूक प्रमाण शोधणे या प्रकल्पाचा शुभारंभ रविवार दि २१ जून रोजी होणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी दिली आहे.








