आपला जिल्हा

मुस्लीम बांधवांच्या उमुमी इज्तेमाला आ.आशुतोष काळेंनी दिली सदिच्छा भेट

मुस्लीम बांधवांच्या उमुमी इज्तेमाला आ.आशुतोष काळेंनी दिली सदिच्छा भेट

मुस्लीम बांधवांच्या उमुमी इज्तेमाला आ.आशुतोष काळेंनी दिली सदिच्छा भेट

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ५ एप्रिल २०२६कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव,कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार कोपरगाव-राहाता तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उमुमी इज्तेमाला आमदार आशुतोष काळे यांनी सदिच्छा भेट देवून मुस्लीम बांधवांशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

सुरेगाव-शहाजापूर परीसरात दिनांक ०३ व ०४ (शुक्रवार व शनिवार) रोजी कोपरगाव-राहाता तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला उमुमी इज्तेमा मोठ्या उत्साहात पार पाडला. या उमुमी इज्तेमासाठी कोपरगाव-राहाता तालुक्यातील जवळपास चार ते पाच हजार मुस्लीम बांधव उपस्थित होते. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते उमुमी इज्तेमाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. आमदार आशुतोष काळे यांनी देखील या उमुमी इज्तेमाला सदिच्छा भेट देवून मुस्लीम बांधवांचा उत्साह वाढविला आणि मुस्लीम बांधवांशी आपुलकीने चौकशी केली.

जाहिरात

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक सूर्यभान कोळपे, माजी उपसभापती व सुरेगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वाल्मिकराव कोळपे, मा.जि.प.सदस्य बाबासाहेब कोळपे, पद्मविभूषण शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, कोळपेवाडीचे उपसरपंच सागर कोळपे, सदस्य राजू कोळपे, महेश कोळपे, श्रावण शेंडगे आदी मान्यवरांसमवेत सुरेगाव, कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील हजारो मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे