अमृतवाहिनी अभियांत्रिकी संगमनेर ऑटोनॉमस साठी सज्ज; विद्यार्थ्यांना मिळणार प्रथम वर्ष बी.टेक साठी प्रवेश
अमृतवाहिनी अभियांत्रिकी संगमनेर ऑटोनॉमस साठी सज्ज; विद्यार्थ्यांना मिळणार प्रथम वर्ष बी.टेक साठी प्रवेश
संगमनेर विजय कापसे दि १४ जुन २०२५–गुणवत्तापूर्ण शिक्षणाने व अद्ययावत सोयी सुविधामुळे देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयाचे ऑटोनॉमस प्रस्तावास मान्यता देऊन पुढील दहा वर्षांसाठी स्वायत्तता बहाल केली आहे. याकरिता आवश्यक मान्यता या अगोदर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही दिलेली असून महाविद्यालयाच्या इतिहासात हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, आणि या ऑटोनॉमस दर्जासाठी आवश्यक सोयीसुविधांसह विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी महाविद्यालय सज्ज आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी दिली. ते म्हणाले यावर्षी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया प्रक्रियेदरम्यान प्राधान्यक्रम नोंदवताना (ऑप्शन फॉर्म भरताना) अमृतवाहिनी निवडण्यासाठी महाविद्यालयाचा प्रकार हा ऑटोनॉमस या टॅब मार्फत उपलब्ध असणार आहे.


स्वायत्तता मिळाल्याने विद्यापीठाच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची 70 टक्के प्रवेशाची मर्यादा न राहता महाराष्ट्रातील सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे. यामध्ये अभ्यासक्रम रचना, परीक्षा पद्धती, मूल्यमापन या मुख्य बाबींवर स्वायत्तता प्राप्त झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयांचा समावेश दरवर्षी वेळोवेळी करून विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट वृद्धीसाठी मदत होणार आहे.

यापूर्वी अमृतवाहिनी महाविद्यालयातील पात्र विभागांना चार वेळा नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडीटेशन, प्रथम नॅकसाठी ए दर्जा आणि सध्या नॅकचा ‘ए प्लस’ दर्जा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील 340 महाविद्यालयांमध्ये सर्वोत्तम दहा महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय म्हणून अमृतवाहिनी अभियांत्रिकीस ए प्लस दर्जा 3.40 सीजीपीएसह मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयास प्रत्यक्ष समितीची भेट न देता केवळ मानांकनाच्या पात्रतेवर ही स्वायत्तता बहाल केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयास यापूर्वी कायम संलग्नता दिलेली असून दोन वेळा विद्यापीठातील सर्वोत्तम महाविद्यालय आणि दोन वेळा सर्वोत्तम प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध योजना टीचिंग व लर्निंग पद्धत, आउट कम बेस्ट शिक्षण यंत्रणा, संशोधन कार्य, पेटंट, ग्रांट, प्रोजेक्ट गुणवत्ता धोरण पीएचडी धारक शिक्षक उपलब्धता, जपानी जर्मन भाषा प्रशिक्षण, डिजिटल लायब्ररी, तांत्रिक कार्यशाळा, उत्कृष्ट शैक्षणिक निकाल, शैक्षणिक वातावरण आदी बाबींमुळे स्वायत्तता मिळणे सहज सोपे झालेले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना प्रत्यक्ष प्रोजेक्ट व त्याचे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी खास बाब म्हणून स्टार्टअप अँड इनोवेशन सेंटर सुरू केलेले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीस महाविद्यालय सहकार्य करत आहे.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीरजी तांबे यांच्या भविष्यवेधी दृष्टिकोनातून व मार्गदर्शनातून अमृतवाहिनी देशातील उच्च शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था ठरत आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या थेट कॅम्पस प्लेसमेंट मधून संधी यामुळे पालक विद्यार्थी यामध्ये महाविद्यालय लौकीकास्पद ठरले आहे. प्रवेशासाठी पालक व विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे तसेच आजपर्यंत 2025 ची 540 कॅम्पस प्लेसमेंट झालेली असून मागील तीन वर्षात प्लेसमेंट चा उच्चांक ठेवण्यास व सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यास महाविद्यालय यशस्वी ठरले आहे.
या ऑटोनॉमसच्या मानांकनाबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीरजी तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडमीक डॉ.जे बी गुरव, प्राचार्य डॉ.एम ए वेंकटेश, रजिस्टार प्रा.व्ही पी वाघे यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडे स्वायतत्ता चर्चा मिळवण्यासाठी समन्वयक म्हणून यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.विष्णू वाकचौरे संगणक विभागाच्या डॉ.स्वाती बोंडे व अंतर्गत गुरुवार गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ.भारत बोरकर यांनी काम पाहिले.
अमृतवाहिनी अभियांत्रिकीला ऑटोनॉमसची मान्यता मिळाल्याने राज्यभरातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बी टेक पदवी प्रवेशाची संधी मिळून सर्वोत्तम व अत्याधुनिक शिक्षण संगमनेर सारख्या ग्रामीण भागात मिळणार आहे. अमृतवाहिनीचे अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित असल्याने आंतरराष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या दृष्टीने दरवर्षी अभ्यासक्रमात बदल होतील व त्याद्वारे सद्यस्थितीतील प्लेसमेंट मध्ये यापेक्षाही जास्त पॅकेजच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या संधी प्राप्त होणार आहेत. यासाठी कंपन्यातील इंटर्नशिप कौशल्य विकास प्रशिक्षण, जपानी व जर्मन भाषा प्रशिक्षण, इंग्लिश भाषा प्रशिक्षण या उपक्रमांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव करून प्रत्येक पदवीधरास प्लेसमेंटच्या संधी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
डॉ.एम.ए.व्यंकटेश – प्राचार्य