संगमनेर

शनिवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात भव्य योग दिनाचे आयोजन – डॉ. जयाताई थोरात

शनिवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात भव्य योग दिनाचे आयोजन – डॉ. जयाताई थोरात

 

सह्याद्री विद्यालय व एकविरा फाउंडेशन, आणि जयहिंद लोकचळवळ वतीने योग शिबिराचे आयोजन

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १९ जुन २०२५- धावपळीच्या जीवनात चांगल्या आरोग्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा असून  एकवीरा फाउंडेशन व सह्याद्री विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज तसेच जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 7.30 वा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे भव्य दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

जाहिरात

या संयुक्त योग दिनाच्या बाबत माहिती देताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या  माध्यमातून महिलांच्या आरोग्य व सबलीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.  21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असून या निमित्ताने शनिवार 21 जून 2025 रोजी सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत भव्य योगा शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे हेही सहभागी होणार आहे. याचबरोबर सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील सुमारे 2000 विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याचबरोबर संगमनेर शहर व तालुक्यातील महिला युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

जाहिरात

आरोग्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक जण धावपळी मध्ये व्यस्त असतो आणि तो आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे असून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. योगातून काम करण्यासाठी प्रत्येकाला ऊर्जा आणि उत्साह मिळत असते. कुटुंबातील इतरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महिलांकरता या योग शिबिरातून नक्कीच उत्साह आणि ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

तरी शनिवार दिनांक 21 जून रोजी होणाऱ्या या भव्य योग दिनाच्या शिबिरात शहर व तालुक्यातील सर्व युवक कार्यकर्ते पदाधिकारी महिला व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन,  सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जयश्री थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे