संगमनेर
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना २५ डॉक्टरांचे पथक, टँकर सह सेवेसाठी विविध सुविधा
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना २५ डॉक्टरांचे पथक, टँकर सह सेवेसाठी विविध सुविधा

संगमनेर विजय कापसे दि १७ जुन २०२५– मोठी समृद्ध परंपरा लाभलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संगमनेर तालुक्यात आगमन झाले असून महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आलेल्या सर्व वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधेसह विविध सुविधा पुरविल्या जात असून यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.