आपला जिल्हा
कोणतीही ठोस उपाययोजना नसलेला सर्वसामान्यांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्प – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
कोणतीही ठोस उपाययोजना नसलेला सर्वसामान्यांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्प – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर विजय कापसे दि १ फेब्रुवारी २०२६- मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशासमोरील आर्थिक व सामाजिक संकटांवर उपाय करण्याऐवजी प्रश्न अधिक गंभीर करणार आहे या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा नसून महागाई व बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना नाही. अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिराश करणारा असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.