वसंत दादा पाटील यांच्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची मोठी संधी – अनिल शिंदे
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत स्वर्गीय वसंत दादा पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंत दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त वसंत तीर्थ येथे अभिवादन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी समवेत मॅनेजर प्रा व्हि.बी धुमाळ प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव,डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ राजेंद्र वाघ,डॉ मनोज शिरभाते, सौ जे बी सेठी, प्रा जी.बी काळे, विलास भाटे ,अंजली कन्नावार आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे म्हणाले की, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्र मध्ये विनाअनुदानित तत्वावर इंजिनिअरिंग कॉलेज करण्याचा निर्णय घेतला. संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घुलेवाडी च्या माळरानावर दादांच्या सहकार्यातून इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले आज या कॉलेजमध्ये केजी टू पीजी शिक्षण मिळत असून उच्च शिक्षणाचे माहेरघर अमृतवाहिनी ठरले आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्था अत्यंत गुणवत्ता पूर्ण काम करत आहे. संस्थेतून लाखो इंजिनियर बाहेर पडले असून आज देशात व विदेशात काम करत आहे यामुळे अनेक कुटुंबांमध्ये समृद्धी निर्माण झाली आहे. याचे सर्वश्रेय स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना आहे. अमृतवाहिनी संस्थेने कायम यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांसह महाराष्ट्र उभा करणाऱ्या नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केल्या असल्याचे ते म्हणाले.

तर प्रा. धुमाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम संगमनेर तालुक्यात कृतज्ञतेचा संस्कार रुजवला आहे आणि त्या माध्यमातून दरवर्षी वसंत तीर्थ येथे अमृतवाहिनी संस्थेच्या वतीने त्यांना अभिवादन केले जाते. यावेळी अमृतवाहिनी संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत उद्योग समूहात प्रेरणास्थळेअमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे यशवंततीर्थ आहे. तर इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशद्वारावर बांबूच्या बेटांमध्ये अद्यावत वसंत तीर्थ उभारले आहे .याचबरोबर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर स्वर्गी इंदिरा गांधी यांचे शक्तिस्थळ असून अमृत उद्योग समूहाच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचे प्रेरणास्थळ आहे या माध्यमातून नवीन पिढीला ऊर्जा मिळत असल्याचे मुख्य कार्यकारी अनिल शिंदे यांनी सांगितले आहे.



