आपला जिल्हा

राहाता उमेदवारांच्या प्रचाराच्या निमिताने विविध प्रभागात मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांशी संवाद साधला.

राहाता उमेदवारांच्या प्रचाराच्या निमिताने विविध प्रभागात मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांशी संवाद साधला.

राहाता उमेदवारांच्या प्रचाराच्या निमिताने विविध प्रभागात मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांशी संवाद साधला.

राहता प्रतिनिधी दि २५ नोव्हेंबर २०२५- नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमिताने जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरीकांच्या भेटी घेवून संवाद साधला.

जाहिरात

मोठ्या कालावधी नंतर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या चांगलाच उत्साह आहे.राहाता शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली महायुतीचे उमेदवार उभे आहेत.सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमिताने विविध प्रभागात मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांशी संवाद साधला.

जाहिरात

शहराच्या सर्वागीण विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही.शहराच्या पायाभूत सुविधा सोडविण्याला नेहमीच प्राधान्य दिले भविष्यात शहरासाठी अधिक काम करायचे आहे.राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाचे निर्णय होत आहेत.शहराच्या पायाभूत सुविधांसाठी महायुती सरकार निर्णय करीत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

जाहिरात

शहराच्या विकास प्रक्रीयेला गती देण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे.जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पाण्याची समस्या दूर करतानाच ,गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी ४००कोटी कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.शहरासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचे काम सुरू असून,शिर्डी येथे सुरू होत असलेली औद्योगिक वसाहत निर्माण होणारे उद्योग या भागाच्या विकासप्रक्रीयेचा मोठा टप्पा असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे