विकासाबरोबर शांतता बंधुभाव टिकवणे गरजेचे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
लक्ष्मण बाबा ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन सेवा समिती उमेदवारांचा प्रचार सुरू

संगमनेर प्रतिनिधी दि २३ नोव्हेंबर २०२५-–संगमनेर तालुक्याला व शहराला विकासाची मोठी परंपरा आहे. आपण सातत्याने निधी आणून मोठमोठी विकास कामे मार्गी लावली आहेत. शांतता सुव्यवस्था, बंधुभाव हे संगमनेर शहराचे वैशिष्ट्य राहिले आहे. मात्र मागील एक वर्षांमध्ये सर्वत्र अशांतता निर्माण झाली असून हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढील काळात शहरात विकासाबरोबरच बंधुभाव व शांतता वाढीस लागेल यासाठी संगमनेरी सेवा समिती काम करेल अशा विश्वास लोकनेते माजी महसूल तथा कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

ग्रामदैवत लक्ष्मण बाबा यांचे दर्शन घेऊन सेवा समिती उमेदवारांचा प्रचार सुरू झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी समवेत शिवसेनेचे अमर कतारी, उमेदवार कविता अमर कतारी शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, पप्पू नेहुलकर, प्रकाश कलंत्री, काशिनाथ आडेप, राजाभाऊ अवसक, दत्तात्रय थोरात ,आकाश जेधे, लखन जेधे, सूरज बागे, सागर बागे ,शुभम परदेशी, ललित शिंपी, मयूर जाधव, अंकित परदेशी, विशाल भोईर ,भगवान घोडेकर, वेणू गोपाल कलंत्री, सतीश आडेप, गोविंद नागरे, किरण हासे, बाळासाहेब गुंजाळ, शंभू जवरे , गौरव जेधे, हर्षल जेधे, अल्ताफ शेख, रोहित वाळके यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मण बाबा यांचा आशीर्वाद घेतला याचबरोबर आय लव संगमनेर या सेल्फी पॉइंट समोर सर्व नागरिकांसमवेत फोटो घेतला.
यावेळी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की लक्ष्मण बाबा हे संगमनेर शहराचे ग्रामदैवत आहे. शहरात धार्मिक आणि बंधुभावाचे वातावरण राहावे यासाठी कायम आपण प्रयत्न केला आहे. संगमनेर शहरात विकासाच्या अनेक योजना मार्गी लागल्या आहेत. निळवंडे पाईपलाईन सह हायटेक बस स्थानक विविध वैभवशाली इमारती यांची निर्मिती करताना अत्यंत काळजीपूर्वक आपण नियोजन केले आहे. मात्र याची कधी जाहिरात बाजी केली नाही. शांतता सुव्यवस्था बंधुभाव हे संगमनेर शहराचे कायमचे वैशिष्ट्य राहिले.
निवडणूक संपली की विरोधक असा भेदभाव आपण कधी केला नाही सर्वांना बरोबर घेतले सुसंस्कृत राजकारणाची आदर्श परंपरा निर्माण केली. त्यामुळे संगमनेर मध्ये सुकून असलेले शांत वातावरण आहे.

संगमनेर नगर परिषदेने सातत्याने चांगले काम केले असून स्वच्छ व सुंदर शहराच्या संकल्पनेत दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा व्यवस्थापनासह अनेक योजना मार्गी लागल्या या चांगल्या कामाला राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पारितोषिक मिळाले.
आगामी काळातही अनेक कामे करायचे असून बंधुभाव शांतता सुव्यवस्था वाढीस लागली पाहिजे या करता प्रत्येकाने काम केले पाहिजे मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहर अस्वस्थ झाले आहे आणि ती चिंता सर्व नागरिकांमध्ये आहे. आपल्याला आपली परंपरा जपायची आहे. संस्कृती जपायची आहे आपले शहर जपायचे आहे संगमनेर कर म्हणून सर्व नागरिक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहे. सर्व उमेदवार संगमनेरची परंपरा जपत चांगले काम करतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी तरुण व युवकांनी मोठी गर्दी केली अनेकांनी सेल्फी साठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या भोवती गरडा घातला. संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांसाठी मतदारांमधील मोठा उत्साह आणि आनंद लक्षवेधी ठरत आहे.



