नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक १ वाजेपर्यंत ४३.४७ % टक्के मतदान
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक १ वाजेपर्यंत ४३.४७ % टक्के मतदान
नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक १ वाजेपर्यंत ४३.४७ % टक्के मतदान
कोपरगाव विजय कापसे दि २६ जुन २०२४– महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघा करिता आज बुधवार दि २६ जून रोजी नाशिक विभागीय मतदार संघातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यातील ५४ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मतदारसंघाकरीता मतदान प्रक्रिया संपन्न होत आहे.
या निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात असून यात महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ॲड. महेंद्र भावसार तर कोपरगाव भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यातच खरी लढत होत आहे.
पाच जिल्ह्यात ४६५०३ पुरुष तर २२८६५ स्त्री मतदार असे एकूण ६९ हजार ३६८ मतदार असून १ वाजेपर्यंत आतापर्यंत ३०१५६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत ४३.४७ टक्के इतके मतदान झाले आहे.
नंदुरबारएकूण मतदान-५३९३झालेले मतदान-२७३८टक्केवारी-५०.७७%धुळेएकूण मतदान-८१५९झालेले मतदान-३८५५टक्केवारी-४७.२५%जळगावएकूण मतदान- १३१२२झालेले मतदान-५३४७टक्केवारी-४०.७५%
नाशिकएकूण मतदान-२५३०२झालेले मतदान-११४९६टक्केवारी-४५.४४%
अहमदनगरएकूण मतदान-१७३९२झालेले मतदान-६७२०टक्केवारी-३८.६४%