संगमनेर

संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
जाहिरात आत्मा

संगमनेर विजय कापसे दि २३ फेब्रुवारी २०२५संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचालित अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इन फार्मासुटिकल्स : एक्सप्लोरिंग न्यू वे फॉर रिसर्च अँड डेव्हलोपमेंट  या विषयावर राष्ट्रीय परिषद, शनिवार, दिनांक २२ फेब्रूवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत व्याख्यान देण्यासाठी औषधनिर्माण क्षेत्रातील प्रसिद्ध वक्ते उपस्थित होते. स्कूल ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च जामिया हमदर्द न्यू दिल्ली, येथील हेड ऑफ फार्मास्युटिकल डिपार्टमेंट डॉ. जावेद अली यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. कॉलेजचे प्राचार्यडॉ. एम. जे. चव्हाण यांनी सर्वमान्यवरांचे स्वागत केले.

जाहिरात

या परिषदेच्या आयोजनामुळे औषधनिर्माण कंपन्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना परस्पर संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असे मत प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण यांनी व्यक्त केले. परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात आवर्जून उपस्थित होते. त्यानी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपुल्या दैनंदिन जीवनात कसा वापर होतो याची काही सुंदर उदारण दिली व परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
डॉ. जावेद अली यांनी व्याख्यानात मार्गदर्शनकरताना सांगितले की औषधीचे शरीरात वितरण प्रभावीपणे करून असाध्य आजारांवर मात केली जाऊ शकते व या संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरु झाला आहे. गुरुनानक कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूर येथील डॉ.सुमित अरोरा यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा संशोधनात कसा
वापर होत आहे हे विस्तृत पणे सांगितले. भारती विद्यापीठ यांचे पुना कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील डॉ.रविंद्र कुलकर्णी यांनी औषध शोध प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर” या विषयावर आपले मत व्यक्त केले. व त्यानंतर भारती विद्यापीठ यांचे पुना कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील डॉ. उर्मिला अस्वार यांनी नेटवर्क फार्माकोलॉजी ही नवीन संकल्पना काय आहे आणि आण्विक डॉकिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला जातो आहे या विषयावर व्याख्यान दिले. या परिषदेत औषधनिर्माण कंपन्या आणि शैक्षणिक क्षेत्रातिल
१८७ प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात

प्रो. आर एम दवांगे यांनी या परिषदेचे समन्वयक म्हणून काम केले. डॉ. वि एस मोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी एन राऊत यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्वशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अद्यावत उपकरणे आणि सुविधा अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये उपलब्ध
आहेत. विद्यार्थ्यांना सुनियोजीत मार्गदर्शन करणाऱ्या अमृतवाहिनीतील गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणालीमुळे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी कायमच यशस्वी ठरत आहेत. कॉलेजला नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रेडिएशन कौन्सिल (नॅक) चे 'ए' ग्रेड मानांकन मिळाले आहे. संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूलमंत्री मा. ना.
बाळासाहेब थोरात व संस्थेचे विश्वस्त माजी आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी  अनिल शिंदे यांनी परिषद यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे