आपला जिल्हा

अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची हिमालयातील पातालसू शिखरावर यशस्वी चढाई

अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची हिमालयातील पातालसू शिखरावर यशस्वी चढाई

अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची हिमालयातील पातालसू शिखरावर यशस्वी चढाई

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १७ जुलै २०२६अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी राजवीर सौरभ कासार आणि त्याचा लहान भाऊ राजदीप सौरभ कासार यांनी हिमालयातील १३,८९५ फूट उंचीचे पातालसू शिखर यशस्वीरीत्या सर करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अवघ्या ८ वर्षांच्या राजवीरने आणि ४ वर्षांच्या राजदीपने कमी वयात हा आव्हानात्मक ट्रेक पूर्ण करत साहसासाठी वय नव्हे, तर जिद्द, चिकाटी आणि उत्साह महत्त्वाचा असतो, हे दाखवून दिले आहे. या यशस्वी मोहिमेमुळे दोन्ही भावांचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

जाहिरात

अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या अंजली कन्नावार यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अशा साहसी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, सहनशीलता, नेतृत्वगुण आणि निसर्गप्रेम विकसित होण्यास मदत होते. या यशामागे दोन्ही विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्य, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

जाहिरात

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर ऑफ अकॅडमिक्स डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्या अंजली कन्नावार तसेच सर्व शिक्षकांनी राजवीर व राजदीप यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक, पालक आणि नागरिकांकडूनही दोन्ही भावांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे