आपला जिल्हा

पतसंस्थांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी जिल्हा बँकेने सकारात्मक भूमिका घ्यावी – काका कोयटे

पतसंस्थांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी जिल्हा बँकेने सकारात्मक भूमिका घ्यावी – काका कोयटे
पतसंस्थांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी जिल्हा बँकेने सकारात्मक भूमिका घ्यावी – काका कोयटे
कोपरगाव विजय कापसे दि १२ जानेवारी २०२६ : “सहकारी पतसंस्था या ग्रामीण व शहरी भागातील सामान्य घटकांचा आर्थिक कणा आहेत. या पतसंस्थांना सक्षम व स्थिर ठेवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार्याची आणि सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. परस्पर विश्वास, समन्वय आणि सहकाराच्या भावनेतूनच जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक बळकट होऊ शकते,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी  अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या विविध अडचणी व अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित प्रश्नांवर १२ जानेवारी २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात राज्य फेडरेशनच्या शिष्टमंडळासह महत्त्वाची बैठक संपन्न झाली या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनचे शिष्टमंडळ तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीस जिल्हा बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील व व्हा. चेअरमन ॲड. माधवराव कानवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाहिरात
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत राज्य फेडरेशन व जिल्ह्यातील पतसंस्थांच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळावी व त्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य लाभावे, या उद्देशाने या निवेदनात विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पतसंस्थांच्या ठेवींवर ०.५० टक्के इतका वाढीव व्याजदर द्यावा, तसेच जिल्हा बँकेत ठेवलेल्या ठेवींवर ओव्हरड्राफ्ट सुविधा घेतल्यास त्या ओव्हरड्राफ्टवर ०.२५ टक्के इतका कमी व्याजदर आकारावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय राखीव निधीतील गुंतवणुकीवर पूर्वी लागू असलेले व्याजदर पुनः लागू करावेत, सहकारी पतसंस्थांना सोनेतारणावर पुनः कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच अडचणीत असलेल्या पतसंस्थांना स्थावर मालमत्तेच्या तारणावर कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा महत्त्वाच्या मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या.

जाहिरात
या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करताना अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांनी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या अडचणींबाबत सकारात्मक विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेशजी वाबळे, नाशिक जिल्हा विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंतशेठ लोढा, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मधुकर भाऊ नवले, अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भाऊ पाटील नवले, श्रीरामपूर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे, अहिल्यानगर मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे, नितीन चासकर आदी मान्यवर व पदाधि

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे