आपला जिल्हा

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या स्वयंसेवकांनी आपल्या ज्ञानाचा फायदा गावाच्या विकासाला करून द्यावा – चैतालीताई काळे

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या स्वयंसेवकांनी आपल्या ज्ञानाचा फायदा गावाच्या विकासाला करून द्यावा – चैतालीताई काळे

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या स्वयंसेवकांनी आपल्या ज्ञानाचा फायदा गावाच्या विकासाला करून द्यावा – चैतालीताई काळे

कोपरगाव विजय कापसे दि १२ जानेवारी २०२६– राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून कौशल्य, नेतृत्व, संघटन आणि सामाजिक जबाबदारीची ओळख होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा गावासाठी कसा फायदा करून देता येईल आणि अभ्यासातून मिळवलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवून गावाला समृद्ध कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावा. AI-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचा शेती उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून नफा कसा वाढवता येईल याची माहिती देवून आपल्या ज्ञानाचा फायदा गावाच्या विकासाला करून द्यावा असा मौलिक सल्ला कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव  चैतालीताई काळे यांनी दिला.

जाहिरात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. शुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने कोपरगाव तालुक्यातील मढी खु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सोमवार (दि.१२) ते रविवार (दि.१८) या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)  शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन  चैतालीताई काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

जाहिरात

 त्या म्हणाल्या की, समाजाला युवकांकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम युवकांचे आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून नवीन पिढी घडवली जात आहे. आपल्या शिक्षणाचा आणि कला गुणांचा समाजाला फायदा कसा होईल यावर स्वयंसेवकांनी भर दिला पाहिजे. आपले आणि आपल्या कुटुंबाचे, महाविद्यालयाचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव मोठे करण्याचा ध्यास घेण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माणुसकी धर्माचा अर्थ जाणतो, श्रम निष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो या विद्यापीठ गीताच्या ओळी अंगीकारून श्रमाचे महत्व जाणावे व माणुसकी धर्म जोपासावा त्याचा तुम्हाला पुढील जीवनात नक्कीच फायदा होईल. या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होणार असून विद्यार्थ्यांनी विविध चर्चा सत्रांच्या माध्यमातून वक्त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपले कर्तृत्व सिध्द करून नाव लौकिक मिळवावे असे आवाहन केले.

जाहिरात

याप्रसंगी उपस्थित असलेले प्रसिद्ध भारुड सम्राट भानुदास बैरागी यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या स्वयंसेवकांना आणि उपस्थितांना भारुडाचे महत्व आणि भारूडातून जनजागृती कशी होते याची माहिती दिली. अभंग, गवळणी आणि भारूड महाराष्ट्राची संकृती आहे. युवकांनी नवीन पद्धतीने हि संस्कुती आपल्या कलेच्या माध्यमातून जोपासली पाहिजे. भारूडातून जनजागृती होत असून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे सांगितले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, सोपानराव आभाळे, सरपंच सुनील भागवत, उपसरपंच बिपीन गवळी, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक प्रदीप कुऱ्हाडे, प्रकाश आभाळे, शंकरराव आभाळे, विलास निंबाळकर, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे इन्स्पेक्टर नारायण बारे, रवींद्र आभाळे ग्रामपंचायत सदस्य अशोक आभाळे, वसंत भागवत, ग्रामसेवक व्ही.डी. सांबारे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ, प्रा.डॉ.पल्लवी मोरे स्वयंसेवक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल पोटे यांनी केले. सूत्रसंचालन  प्रा.उमाकांत कदम यांनी केले तर आभार प्रा.भीमराव रोकडे यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे