जितेंद्र रणशूर झाले उपनगराध्यक्ष, काले अजमेरे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी; नगरपरिषदेत कोल्हे गटाचा झंझावात कायम
विवेकभैय्या कोल्हे यांच्या चाणक्यनीतीसमोर विरोधकांचा पुन्हा पराभव
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १२ जानेवारी २०२६–कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरल्यानंतर अखेर कोल्हे गटाने या रणांगणात दणदणीत बाजी मारली आहे. जनतेचा स्पष्ट कौल कोल्हे गटाच्या बाजूने लागत पराग संधान नगराध्यक्षपदी विजयी झाले.तब्बल १९ नगरसेवक भाजपा मित्रपक्ष कोल्हे गटाचे निवडून आल्याने कोपरगावच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला गेला आहे. ही केवळ निवडणूक नाही तर विवेकभैय्या कोल्हे यांच्या दूरदृष्टी, संयमी नेतृत्व आणि अचूक रणनीतीवर जनतेने टाकलेली मोहोर आहे.
जाहिरात
जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे, नगरसेवकपदाचा अनुभव आणि आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे जितेंद्र रणशूर यांची उपनगराध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. विवेकभैय्या कोल्हे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या रणशूर यांच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विकासासाठी संयमी नगराध्यक्ष आणि जनहितासाठी आक्रमक उपनगराध्यक्ष असे तगडे आणि परिणामकारक समीकरण कोल्हे गटाने सभागृहात उभे केले आहे.जाहिरात
नगरसेवक पदाचा पूर्वानुभव तसेच पक्षहितासाठी ठाम भूमिका घेणारे अतुल काले यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली तसेच कडवी झुंज देत विरोधकांना रोखून धरणाऱ्या अजमेरे कुटुंबालाही संधी दिली आहे. सोनल अमोल अजमेरे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा मान देत कोल्हे गटाने दिला आहे. पक्षासाठी काम करणारा हा योग्यवेळी पुढे आणला जातो हे विवेकभैय्या कोल्हे यांचे धोरण या निर्णयातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत विवेकभैय्या कोल्हे यांची चाणक्यनीती पुन्हा सिद्ध झाली असून बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांना भविष्यात वेगवेगळी ताकद देण्याचे संकेत मिळाले आहेत. विशेष म्हणजे उपनगराध्यक्षपदासाठी कोणतेही आरक्षण नसताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला संधी देत कोल्हे गटाने सर्वसमावेशक आणि आदर्श राजकारणाचा वस्तुपाठ दिला आहे.
दुसरीकडे त्यांच्याकडे बहुमत नसतानाही निवडणूक बिनविरोध होऊ न देणाऱ्या काळे गटाची अक्षरशः नाचक्की झाली व तोंडघशी पडावे लागले आहे. भाजपा मित्रपक्ष गटनेते प्रसाद आढाव यांनी विनंती करूनही काळे गटाने केवळ आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी मिळू नये यासाठी आडवे येण्याची भूमिका घेतली. ते पितळ उघड झाल्याने काळे गट झालेल्या मतदानातून तोंडावर पडला. यामुळे विवेकभैय्या कोल्हे यांच्या धुरंधर राजकीय नीतीसमोर काळे गटाला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले असून कोपरगावच्या राजकारणात कोल्हे गटाचे वर्चस्व ठामपणे अधोरेखित झाले आहे.
कोल्हे गटाचे सर्व नगरसेवकांनी बहुमताने सदर निवडणूक जिंकली असून काळे गटाने जाणीवपूर्वक केलेल्या विरोधाला उघडे पाडत दणदणीत विजय मिळवला आहे. पालिका परिसरात एकच जल्लोष या सभेनंतर झाला.कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.