आपला जिल्हा

कोपरगांव पालिका पदाधिकाऱ्यांनी प्रगत शहराच्या धर्तीवर विकास करावा – बिपीनदादा कोल्हे

कोपरगांव पालिका पदाधिकाऱ्यांनी प्रगत शहराच्या धर्तीवर विकास करावा – बिपीनदादा कोल्हे
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संजीवनी कार्यस्थळावर सत्कार संपन्न
जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १४ जानेवारी २०२६

कोपरगांव शहरवासियांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष व बहुमताने निवडुन दिलेल्या नगरसेवकांवर जो विश्वास टाकला आहे त्याला कुठेही तडा जाउ न देता पालिका सत्ताधा-यांनी इंदौर, विशाखापटटणम आदि शहराच्या धर्तीवर कोपरगांव शहराचा विकास करून जिल्हयात पालिकेचा कारभार नांवलौकीकास्पद करावा असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

जाहिरात
          कोपरगांव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर, स्विकृत नगरसेवक अतुल काले, सौ. सोनल अमोल अजमेरे यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मकर संक्रांतीच्या पर्वावर संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने बुधवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

जाहिरात
         श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव शहर विकासात सातत्यांने योगदान देत वाढत्या लोकसंख्येला पुरक अशी ध्येय धोरणे राबवुन त्यानुरूप काम केले. कोपरगांव शहरवासियांनी ज्या विश्वासांने भाजपा रिपाई मित्रपक्ष लोकसेवा आघाडीच्या हाती पालिकेची सत्ता दिली त्यामुळे आपल्या सर्वांबरोबरच स्विकृत नगरसेवकांचीही जबाबदारी आता वाढली आहे. कोपरगांव, शहरवासियांना मुबलक पाणी, स्वच्छ, सर्वांग सुंदर कोपरगांव, दर्जेदार रस्ते, धुळमुक्त कोपरगाव आदि विकासाच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी कटीबध्द रहावे. इंदौर, विशाखापटटणम आदि प्रगत शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या सोयी सुविधांचा पालिका सत्ताधा-यांनी बारकाईने अभ्यास करावा. शासकीय, निमशासकीय योजनांची पुर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
           सत्कारास उत्तर देतांना लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली पालिका निवडणुकीत भाजपा रिपाई मित्रपक्षाने जो विश्वासनामा जनतेपुढे सादर केला त्याची सतत काळजी घेवुन काम करू. उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर म्हणाले की, कोल्हे कुटूंबियांनी आपली उपनगराध्यक्षपदी निवड करून आंबेडकरी चळवळीचा मोठा गौरव केला आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी ज्या विश्वासांने आम्हांस स्विकृत नगरसेवक म्हणुन निवडले तो सार्थ करून शहरवासियांच्या विकासात जाणीवपुर्वक योगदान देवु असे अतुल काले, सोनल अजमेरे यावेळी बोलतांना म्हणांले. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे