आपला जिल्हा

विज्ञानाची सृष्टी मिळाली, पण दृष्टी हरवली- अॅड.  रंजना गवांदे

विज्ञानाची सृष्टी मिळाली, पण दृष्टी हरवली- अॅड.  रंजना गवांदे

वैज्ञानिक दृष्टीकोन  या विषयावर कोपरगाव महाविद्यालयात विशेष व्याख्यान

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ जानेवारी २०२६श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे विवेक वाहिनी, सायन्स असोसिएशन आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक वाहिनीच्या उद्घाटन समारंभ निमित्ताने ‘वैज्ञानिक दुष्टीकोन ’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अॅड.  रंजना गवांदे आपले विचार मांडले.  या व्याख्यानाचे  अध्यक्षीय स्थान डॉ. घनश्याम भगत यांनी भूषविले. सदर व्याख्यानासाठी  रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन  अॅड. भगीरथकाका शिंदे शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या .

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या

जाहिरात

  राज्य सरचिटणीस  अॅड.  रंजना गवांदे यांनी, “पृथ्वीची उत्पत्ती, मानवाची उत्पत्ती, मानवी मेंदूची वाढ व विकास या विषयांचे स्पष्टीकरण वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिले. पृथ्वीची निर्मिती नैसर्गिक प्रक्रियांतून कशी झाली, मानवाचा उत्क्रांतीशील प्रवास कसा घडत गेला आणि मानवी मेंदूचा विकास ज्ञान, अनुभव व प्रयोगांमुळे कसा वाढत गेला, यामधून माणसाचा प्रयत्नवादी दृष्टिकोन अधोरेखित होत असून निरीक्षण, तर्क आणि प्रयोगशीलतेच्या आधारे मानवाने प्रगती साधल्याची अनेक उदाहरणे सांगून श्रद्धावादी दृष्टिकोनाचाही उल्लेख करत मानवी संस्कृती, परंपरा व श्रद्धा समाजजीवनात कशा रुजल्या आहेत, हे स्पष्ट केले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात डॉ. घनश्याम भगत यांनी, “वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे ज्ञानाला वस्तुनिष्ठता व सार्वत्रिकता लाभते, तर व्यक्तीच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभूतींवर आधारित वैयक्तिक अनुभव भावनिक, सांस्कृतिक व सामाजिक संदर्भांनी घडलेला असतो. या दोन्हींच्या समन्वयातून समाजजीवनाचे वास्तव अधिक समतोल व व्यापक स्वरूपात समोर येते.”असे सांगितले.

विवेकवाहिनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक,स्वागत आणि पाहुण्यांचे परिचय  डॉ.प्रतिभा रांधवणे यांनी केले. सदर कार्यक्रमास कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, प्रा. उज्ज्वला भोर, डॉ. संतोष पवार, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांच्यासह महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे प्राध्यापक व विद्यार्थी    मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता प्रसाद यांनी केले, तर आभार प्रदर्शन  प्रा. मोहनसिंह पाडवी यांनी व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे