एस.एस.जी.एम महाविद्यालयात भाषा विषयक कार्यशाळा संपन्न

एस.एस.जी.एम महाविद्यालयात भाषा विषयक कार्यशाळा संपन्न
एस.एस.जी.एम महाविद्यालयात भाषा विषयक कार्यशाळा संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि १५ जानेवारी २०२६–श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे व रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विभाग अहिल्यानगर येथील कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा शिक्षकांसाठी भाषा विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे अध्यक्षीय स्थान प्रमोद तोरणे यांनी भूषविले. सदर कार्यशाळेसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. ॲड. भगीरथकाका शिंदे तसेच आमदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा संदेश पाठवून कार्यशाळेसाठी उपस्थित शिक्षकांचे कौतुक केले.

उदघाटनपर भाषणात काकासाहेब वाळुंजकर साहेब यांनी गुणवत्ता विकास कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक असून भाषा ही विकासाची जननी आहे, असे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून शरद दुधाट, संदीप शिंदे, श्रीकांत थोरात, संदीप दरेकर यांनी शिक्षकांना भाषा विकास, गुणवत्ता सुधारणा व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात रयत शिक्षण संस्थेचे सहायक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणानुसार भाषा विकासासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवत्ता विकास कक्ष स्थापन करणे, भाषा विकासास पूरक कार्यक्रम राबविणे तसेच शॉर्ट टर्म कोर्स व व्यावसायिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी, “उत्तर विभाग हा गुणवत्ता विकास कक्ष स्थापन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता कल स्पर्धा परीक्षांकडे असल्याने भाषा विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे स्पष्ट केले”. सदर कार्यक्रमास कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांच्यासह उत्तर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा शिक्षकमोठ्या संख्येने उपस्थित होतेसूत्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता अत्रे व प्रा. मनिषा निफाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एकनाथ कळमकर यांनी व्यक्त केले.



