आपला जिल्हा

आ.आशुतोष काळेंच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम,  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सडे फाटा-सडे रस्त्याचे काम पूर्ण 

आ.आशुतोष काळेंच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम, 
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सडे फाटा-सडे रस्त्याचे काम पूर्ण 
आ.आशुतोष काळेंच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम, 
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सडे फाटा-सडे रस्त्याचे काम पूर्ण 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ जानेवारी २०२६कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेतील रखडलेली रस्त्यांची कामे मुजोर ठेकेदारांमुळे रखडली होती. आमदार आशुतोष काळे यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर चालना मिळाली आहे. कोपरगाव तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सडे गावातील सडे गाव ते सडे फाटा या एक कि.मी.रस्त्याचे खराब झालेले काम पुन्हा डांबरीकरण करून पूर्ण करण्यात आले असून अनेक रखडलेले रस्त्यांची कामे सुरुवात होत असल्याचे आशादायक चित्र कोपरगाव मतदार संघात दिसत असून त्यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात
रस्ते ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानला जातो. दळणवळणाची साधने सक्षम झाल्यास शिक्षण,आरोग्य,शेतीमालाची वाहतूक आणि दैनंदिन जीवन सुलभ होते. याच उद्देशाने आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध योजनांतून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून अनेक रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होवूनही हि कामे मुदत संपली तरी सुरु झाली नव्हती व काही रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत होती.त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.१३) रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेच्या अधिकाऱ्यांची व रस्त्यांची कामे घेतलेल्या ठेकेदारांची एकत्रित बैठक घेवून त्यांना रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून चांगलेच खडसावले होते. तसेच अधिकाऱ्यांना विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याचा ईशारा देवून मुजोर व निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना कायमचे काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या होत्या.

जाहिरात
आ.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला असून खराब रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली असून नुकताच डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेला सडे गाव ते सडे फाटा हा एक कि.मी. रस्ता याचे बोलके उदाहरण आहे.त्या बैठकीत उपस्थित असलेल्या रस्त्यांचे काम घेतलेल्या ठेकेदारांनी रखडलेल्या रस्त्याचे किती दिवसात काम पूर्ण होईल याची अंतिम तारीख दिलेली आहे.दिलेल्या तारखेच्या आत काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारही अंग झटकून कामाला लागले असून पुढील आठवड्यात अशाच रखडलेल्या वारी-कान्हेगाव रस्त्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे मतदार संघातील नागरिक सुखावले असून मुजोर ठेकेदारही रस्त्यांची कामे सुरु करण्यासाठी यंत्र सामुग्री जमा करू लागले असून लवकरच रखडलेल्या सर्वच रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याचे ठेकेदारांच्या सुरु असलेल्या लगबगीवरून दिसून येत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे