आपला जिल्हा

करंजी जिल्हा परिषद शाळेचे १०० विद्यार्थी अनुभवणार वायुसेनेचे प्रात्यक्षिक 

करंजी जिल्हा परिषद शाळेचे १०० विद्यार्थी अनुभवणार वायुसेनेचे प्रात्यक्षिक 

करंजी जिल्हा परिषद शाळेचे १०० विद्यार्थी अनुभवणार वायुसेनेचे प्रात्यक्षिक 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ जानेवारी २०२६विमानात बसण्याची अथवा विमान बघण्याची लहानापासून मोठ्याना एक वेगळीच हौस असते आणि विशेष म्हणजे सैनिकी लढाऊ विमान किंवा त्याचे प्रात्यक्षिक बघण्याचा एक वेगळीच मज्जा असते आणि हीच मज्जा करंजी जिल्हा परिषद शाळेचे चिमुकले नाशिक मध्ये होणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या अभूतपूर्वक सूर्यकिरण एअर शोचे प्रात्यक्षिक गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी अनुभवणार आहे.

जाहिरात
 सविस्तर वृत्त असे की, नाशिक मधील गंगापूर धरण परिसरात भारतीय वायुसेनेचे गुरुवार दि २२ जानेवारी व शुक्रवार दि २३ जानेवारी रोजी चित्तथरारक लढाऊ विमानांचे प्रात्यक्षिक होणार आहे हे प्रात्यक्षिक बघण्यासाठी बघ्याची देखील मोठी गर्दी असणार आहे याच वेळेत करंजी जिल्हा परिषदेच्या शाळेची पूर्वनियोजित शैक्षणिक सहल नाशिक दर्शनासाठी जाणार असल्याने या प्रात्यक्षिकेची माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भोकरे यांना समजताच त्यांचा मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षकांनी नाशिक जिल्हा प्रशासन सोबत संपर्क साधत सदर प्रात्यक्षिक ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना पाहण्यास मिळावे अशी विनंती केली असता नाशिक जिल्हा प्रशासनाने तत्काळ शाळेसाठी १०० प्रवेशिका मोफत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे २२ जानेवारी रोजी करंजी जिल्हा परिषद शाळेचे तब्बल १०० विद्यार्थी भारतीय वायुसेनेचा अभूतपूर्व सूर्यकिरण एअर शो प्रत्यक्षात जवळून अनुभवणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना सहलीला जाण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

जाहिरात
 हा जागतिक दर्जाचा अभूतपूर्व भारतीय वायुसेनेचा सूर्यकिरण एअर शो ग्रामीण भागातील करंजी जिल्हापरिषद शाळेच्या मुलांना  पाहता यावा यासाठी १०० प्रवेशिका मोफत उपलब्ध करून दिल्या बद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, अथर्व खोत आदी नाशिक जिल्हा प्रशासनाचे करंजी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे