आपला जिल्हा

कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष रणशूर यांच्या कुटुंबीयांकडून नागरीकांना दमबाजी करून जबर मारहाण, २२ वर्षीय युवती गंभीर जखमी

कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष रणशूर यांच्या कुटुंबीयांकडून नागरीकांना दमबाजी करून जबर मारहाण, २२ वर्षीय युवती गंभीर जखमी

कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष रणशूर यांच्या कुटुंबीयांकडून नागरीकांना दमबाजी करून जबर मारहाण, २२ वर्षीय युवती गंभीर जखमी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ जुलै २०२६ :नुकत्याच पार पडलेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ०९ क्र मध्ये शुक्रवार (दि.१६) रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे कोल्हे गटाचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली असून पार पडलेल्या निवडणुकीत आमचे काम का केले नाही? असा प्रभागातील नागरीकांना जाब विचारत उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या कुटुंबातील एकूण आठ व्यक्तींनी कालेकर कुटुंबातील पाच व्यक्तींना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश असून यातील२२ वर्षीय युवतीला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली असून सदरची युवती प्रवरानगर येथील पीएमटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे. त्या युवतीची प्रकृती गंभीर असून कोपरगावात कोल्हे गटाकडून सत्तेचा उन्माद सुरु झाला असल्याचे प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते सागर आहेर यांनी म्हटले आहे.

जाहिरात

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हे गटाचे विद्यमान उपनगराध्यक्ष असलेल्या जितेंद्र रणशूर यांच्या प्रभाग क्र.०९ मध्ये कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला कमी मतदान मिळाले, तुम्ही आमचे काम केले नाही, आम्ही तुम्हाला पाहून घेवू असे वक्तव्य करून जीवे मारण्याची धमकी जितेंद्र रणशूर यांच्या कुटुंबातील राहुल रणशूरगौतम रणशूरअनिकेत रणशूर,मनीषा रणशूर,रेणुका रणशूर,रवींद्र धुळेमुकेश धुळेसागर वीर आदींनी प्रभागात वास्तव्यास असणाऱ्या राहुल श्रीकांत कालेकर, गायत्री राहुल कालेकर, रेणुका श्रीकांत कालेकर, संगीता श्रीकांत कालेकर, विशाल श्रीकांत कालेकर यांना देवून जितेंद्र रणशूर यांच्या कुटुंबातील एकून आठ व्यक्तींनी कालेकर कुटुंबातील पाच  व्यक्तींना जबर मारहाण केली. मारहाण एवढी जबर होती की, या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रेणुका श्रीकांत कालेकर या युवतीवर कोपरगाव, शिर्डी येथे उपचार होवू शकले नाही. त्यामुळे त्या युवतीला प्रवरानगर येथील पीएमटी हॉस्पिटल येथे उपचारार्थ हलविण्यात आले यावरून मारहाण किती गंभीर स्वरुपाची असेल याची प्रचीती येते.

जाहिरात

या सर्व प्रकारातून उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर कुटुंबियाकडून कालेकर कुटुंबाला मारहाण करून प्रभागात दहशत निर्माण करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांचा तपास संथ गतीने सुरु असला तरी आम्ही मात्र गप्प बसणार नाही असा पवित्रा सागर आहेर यांनी घेतला आहे. प्रभागातील नागरीकांना दमबाजी करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हि उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही पोलीस प्रशासन त्यांच्या दबावाला जरी बळी पडत असले तरी आम्ही वरिष्ठांकडे दाद मागू. पोलिसांनी सदरच्या घटनेचा नि:पक्षपाती तपास करून हल्ल्याच्या मागे असणारा मास्टर माइंड उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना तात्काळ अटक करावी अन्यथा प्रभागातील नागरीकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील असा ईशारा सागर आहेर यांनी दिला आहे.

प्रवरानगर येथील पीएमटी हॉस्पिटल येथे गंभीर जखमी असलेली रेणुका कालेकर उपचार घेत आहे.

 

उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे खरे रंग उघड 

 कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांची मागील आठवड्यात उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या सत्काराची फुले अजून सुकली नसेल तोच त्यांनी आपले खरे रंग दाखवून प्रभागातील नागरीकांना जीवे मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे अजून तर पूर्ण पाच वर्षाचा कालावधी जायचा आहे त्यामुळे प्रभागातील नागरीकांना अजून काय काय भोगावे लागेल हे नागरीकांच्या समजण्याच्या पलीकडचे आहे.-सागर आहेर

कोपरगावात महिला सुरक्षित आहेत का?

      सत्तेचा उन्माद एवढा नसू नये जी सत्ता महिलांच्या जीवावर उठण्यापर्यंत मजल मारते. राजकारणात निवडणूक संपली की राजकारण संपणे अपेक्षित असते. मात्र निवडणुकीपूर्वी ज्या व्यक्ती मतांचा जोगवा मागण्यासाठी हात जोडतात, पाय धरतात त्याच व्यक्ती सत्तेची कवचकुंडले परिधान केल्यावर त्यांची महिलांच्या अंगावर हात उचलायची हिम्मत होत असेल तर निश्चितच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर कुटुंबियाकडून युवतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यावरून खरंच कोपरगावात महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही.

राहुल कालेकर (जखमी युवतीचा भाऊ)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे