आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे शैक्षणिक संकुलात  सुशीलामाई काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे शैक्षणिक संकुलात  सुशीलामाई काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे शैक्षणिक संकुलात  सुशीलामाई काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२६– स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा महाविद्यालयात संस्थेच्या सचिव  चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गौतम पब्लिक स्कूलमध्ये स्व. सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या माईज गार्डनला यावेळी भव्य विदयुत रोषणाई करण्यात आली होती. तसेच आतंर शालेय भव्य चित्रकला स्पर्धेचे आणि प्राथमिक विभागाचे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्काउट, गाईड व एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी माईसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ माईज गार्डनची स्वच्छता करून झाडांना पाणी दिले. विद्यार्थ्यांनी वर्षभर तालुका, जिल्हा व देशपातळीवर होणा-या क्रिडा, कला, सांस्कृतिक, विज्ञान प्रदर्शन तसेच इतर स्पर्धामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा व रौप्य महोत्सवी वर्षात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रईसा शेख यांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचा करण्यात आला.

जाहिरात

सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येवून वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ होत्या.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे इन्स्पेक्टर प्रा.नारायण बारे यांनी स्वर्गीय सौ. सुशीलामाई काळे यांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले की,शिक्षण हीच प्रगतीची खरी ताकद आहे, या विचारावर ठाम विश्वास ठेवत स्व.सौ. सुशीलामाई काळे यांनी शाळा उभारणीसाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांच्याकडे आग्रह धरला.मुलगी शिकली तर दोन घरांना सुशिक्षित करते या भावनेतून त्यांनी तालुक्यातील अनेक मुलींना शिक्षणासाठी विशेष प्रोत्साहन दिले असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.

जाहिरात

            गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट यांच्या वतीने शहाजापूर, कोळपेवाडी, कुंभारी गावामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवून परिसराची स्वच्छता केली. कोळपेवाडी बाजारतळ आणि राघवेश्वर देवस्थान कुंभारी, मंदिर व घाट परिसरात वृक्षारोपण केले.न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड व न्यु इंग्लिश स्कूल काकडी येथे कै. सौ. सुशीलामाई काळे (माईसाहेब) यांच्या २७ पुण्यतिथीनिमित्त सुशीलामाई काळे यांचे प्रतिमा पूजन व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शैक्षणिक वार्षिक गुणवंत विद्यार्थ्यांचा, क्रीडा आणि इतर स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ.सुशीलामाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत असताना माईचे कार्य हे न विसरता येणारे असल्याचे सांगितले.

यावेळी ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात यावेळी राघवेश्वर मंदिराचे मठाधीपती महंत १०८ श्री राघवेश्वरानंदगिरी महाराज, बाबुराव कोल्हे, संस्थेचे इन्स्पेक्टर प्रा. नारायणराव बारे, शहाजापूरचे उपसरपंच शरद वाबळे, कोळपेवाडी गावचे उपसरपंच सागर कोळपे, अनिल कोळपे, देर्डे चांदवडच्या सरपंच प्रतिभा गायकवाड, मढी खुर्दच्या माजी सरपंच व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, मढी बु.चे सरपंच प्रवीण निंबाळकर, देर्डे कोऱ्हाळेचे उपसरपंच निलेश डुबे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग दिघे, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव गुंड, पोपटराव कोल्हे, प्रीतम मेहेत्रे, देर्डे चांदवडचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव होन, चांगदेव होन, महेश माळी, कैलास डुबे, प्रभाकर गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, सुभाष सोनवणे, गोकुळ कांडेकर, अनिल गुंजाळ, ग्रामस्त, तसेच प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ, प्राचार्य वसीम शेख, प्राचार्य नूर शेख, मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, बाळासाहेब गुडघे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे