आपला जिल्हा
अजितदादांची थोरात कारखान्याला भेट ही संगमनेरची शेवटची ठरली

अजितदादांची थोरात कारखान्याला भेट ही संगमनेरची शेवटची ठरली

संगमनेर विजय कापसे दि ३० जानेवारी २०२६- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राचा उमदा नेता गेल्याने राज्यावर मोठा आघात झाला असून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. संगमनेर शहर व तालुक्यातही अत्यंत शोकाकुल वातावरण असून अजित दादा पवार यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे अचानक थोरात सहकारी साखर कारखान्याला दिलेली भेट ही संगमनेरची शेवटची भेट ठरली आहे.










