आपला जिल्हा

टाकळी ग्रामस्थांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

टाकळी ग्रामस्थांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
टाकळी ग्रामस्थांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ फेब्रुवारी २०२६नुकतेच राज्याचे लोकनेते उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री  अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याबद्दल त्यांना तालुक्यातील टाकळी येथील ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा घेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जाहिरात
 अर्थ, कृषी, सहकार, साखर उद्योग अशा अनेक क्षेत्रांसोबतच महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण व ते प्रश्न सोडवण्याची क्षमता अजितदादांकडे होती. अजितदादांचे आपल्यातून जाणे ही महाराष्ट्राची कधीही न भरुन निघणारी हानी असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करतांना व्यक्त केले.

जाहिरात
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर,सरपंच संदीप देवकर, जेष्ठ नेते छगनराव देवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी देवकर,संचालक निलेश देवकर, मा. सभापती सुनिल देवकर, पोलीस पाटील जितेंद्र देवकर,अमोल देवकर, बाळासाहेब पाईक, उद्धव जाधव,राजेंद्र देवकर, अंबादास देवकर, बाळासाहेब देवकर, स्वप्निल देवकर, निरंजन देवकर, शिवसेना शाखा प्रमुख नवनाथ देवकर, गणेश देवकर, लखन मालकर, सनी आव्हाड आदी मान्यवरांनी स्व. अजितदादांप्रती आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी टाकळी ग्रामस्थ सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे