आपला जिल्हा

आरोग्य दूत गव्हाणे यांच्याकडून महाविद्यालयास लेझीम व ढोल पथक भेट

आरोग्य दूत गव्हाणे यांच्याकडून महाविद्यालयास लेझीम व ढोल पथक भेट

आरोग्य दूत गव्हाणे यांच्याकडून महाविद्यालयास लेझीम व ढोल पथक भेट

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ फेब्रुवारी २०२६नेहमीच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथील आरोग्य दूत म्हणून सर्व परिचित असलेले बाळासाहेब गव्हाणे यांच्यातर्फे जवळके येथील के.बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास लेझीम ढोल पथक भेट म्हणून देण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

अंजनापूर येथील आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांनी आजपर्यंत जवळके व अंजनापुर परिसरात वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला आहे तर परिसरातील सर्वच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना अनेकदा शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केले आहे.त्यासोबत अनेक आरोग्य शिबीर यशस्वी राबवित रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे रक्तदान शिबिरे राबवत अनेकांचा जीव वाचवत सर्वश्रेष्ठ कार्य केले आहे.साध्य मोबाईलच्या जमान्यात लोप पावत चाललेली महाराष्ट्र संस्कृतीच्या कलेचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या लेझीम व ढोल पथकाचा संपूर्ण संच जवळके येथील के.बी रोहमारे शाळेला भेट देत तेथे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याचे मार्गदर्शन केले.

जाहिरात

याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक सुजित रोहमारे यांनी आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांचे शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत महाविद्यालयाच्या वतीने त्यांचें आभार व्यक्त केले तर या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक लक्ष्मण थोरात, मा. सरपंच बाबुराव थोरात, नानासाहेब पाडेकर, थोरात सर,पत्रकार विनोद जवरे महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन राहाणे आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे