आपला जिल्हा

कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळणार

कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळणार
मुख्यमंत्र्यांसमवेत नवनिर्वाचित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांची झाली सदिच्छा भेट
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ फेब्रुवारी २०२६राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व नगरसेवकांसह सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यभर भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन व्यक्त करण्यात आले.येवला येथे झालेल्या या भेटीदरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती.

जाहिरात
यावेळी कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा झाली. नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान जनतेसमोर मांडण्यात आलेल्या ‘विश्वासनामा’तील विविध विकासकामे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून सकारात्मक पाठबळ देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते विकास, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक असलेल्या योजना आणि निधीबाबत मागण्या मांडण्यात आल्या.

जाहिरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन केले. “कोपरगाव शहराने भविष्यात विकासाची घोडदौड करावी, यासाठी राज्य शासनाचे संपूर्ण पाठबळ राहील. शहराला अधिकाधिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

जाहिरात
या भेटीदरम्यान कोपरगाव शहराशी संबंधित विविध विकासात्मक विषयांचे आणि मागण्यांचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात आले. नगरपरिषद आणि राज्य शासन यांच्यातील समन्वयातून कोपरगावचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करत ही भेट अत्यंत सकारात्मक व विकासाभिमुख ठरली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे