आपला जिल्हा

शेखर सोसे यांची एनएसयुआय च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

शेखर सोसे यांची एनएसयुआय च्या जिल्हाध्यक्षपदी निवड
शेखर सोसे यांची एनएसयुआय च्या जिल्हाध्यक्षपदी निवड
संगमनेर विजय कापसे दि ९ फेब्रुवारी २०२६काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.प्रदेशाध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शेखर सोसे यांची एनएसयुआयच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.

जाहिरात
नुकताच शिवाजीनगर सुदर्शन निवासस्थान येथे लोकनेते बाळासाहेब थोरात व उत्तराखंडचे माजी मंत्री सुरेंद्रसिंग नेगी, डॉ.जयश्रीताई थोरात, शरद नाना थोरात यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा, नगरसेवक नितीन अभंग, अमोल कवडे, संदीप लोहे, अंबादास आडेप, सौरभ उमरजी, प्रतीक जाजू, रमेश नेहे,सुमित पानसरे,एकनाथ श्रीपाद,भूषण वाकचौरे,अक्षय गुंजाळ,प्रथमेश गरुडकर,जगदीश खडांगळे,शुभम वाघ, सचिन आहेर, मयूर म्हसे आदींसह विविध युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

शेखर सोसे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेस बळकट करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. खेडोपाडी आणि गावागावांमध्ये तरुणांचे संघटन करताना डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य पातळीवरील निरीक्षक कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वाखाली त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

जाहिरात

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसला मोठी परंपरा असून काँग्रेसने कायम लोकशाही आणि राज्यघटनेचा विचार जोपासला आहे. हा देशाच्या एकात्मतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा विचार असून हा विचार अधिक बळकट करण्यासाठी तरुणांनी अधिक काम करण्याची गरज आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना ही विचारांचे प्रबोधन करणारी असून शेखर सोसे जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चित चांगले काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

तर डॉ.जयश्री ताई थोरात म्हणाल्या की, सध्या युवकांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांना मूळ विचारांपासून भरकटविले जात आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत आहे. देशाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी युवकांनी काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जावे असे आवाहन त्यांनी केले.

तर शेखर सोसे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून यापुढील काळामध्ये एन एस यु आय च्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना काँग्रेसमध्ये सक्रिय काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल असे ते म्हणाले. यावेळी विविध कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

शेखर सोसे यांच्या निवडीबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गा ताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, शरद नाना थोरात, अजय फटांगरे,सोमेश्वर दिवटे,निखिल पापडेजा, हैदर अली, गौरव डोंगरे,अर्चना बालोडे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे