आपला जिल्हा

कोपरगाव तालुक्यात करंजी जेऊर पाटोदा व खिर्डी गणेश मध्ये विविध  विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

कोपरगाव तालुक्यात करंजी जेऊर पाटोदा व खिर्डी गणेश मध्ये विविध  विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

कोपरगाव तालुक्यात करंजी जेऊर पाटोदा व खिर्डी गणेश मध्ये विविध  विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ मार्च २०२६–   कोपरगाव मतदारसंघातील गावांचा विकास केवळ रस्त्यांनी नाही तर शिक्षणाच्या बळावर होणार असल्याने रस्ते आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा या दोन्हींचा समतोल साधून विकास करण्याच्या उद्देशाने खिर्डी गणेश, करंजी आणि जेऊर पाटोदा या परिसरात ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या नागरी सुविधांच्या विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सोमवार दि. २ रोजी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

जाहिरात

या मध्ये करंजी परिसरासाठी प्रजिमा ४ बोलकी ते पढेगाव २ कोटी ६४ लाख रुपयांच्या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व १५ लाख रुपये निधीतून छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. करंजी ते आंचलगाव २० लाख रुपयांचे आणि करंजी ते चरमळ वस्ती शाळा रस्ता १० लाख किंमतीचे डांबरी स्त्यांचे लोकार्पण करून नागरिकांसाठी खुले करण्यात आले. खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीत २० लक्ष रुपये निधीतून नगर-मनमाड रस्ता ते रावसाहेब बावके वस्ती रस्ता आणि खिर्डी गणेश-अंचलगाव शीव रस्ता खडीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. याच बरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी १२ लक्ष रुपये निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या एक नवीन खोली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. जेऊर पाटोदा परिसरात ३० लक्ष रुपये निधीतून जिजाऊ पार्क ते चंद्रलीला नगर प्रजिमा ८ पर्यंत या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने चंद्रलीला कमान ते श्रीकृष्ण नगर या भागात १० लक्ष रुपये खर्चून भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. याचवेळी १० लाख निधीच्या इजिमा १६० ते योगेश साळवे यांच्या घरापर्यंत झालेल्या डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण करून हा रस्ता रहिवाशांसाठी खुला करण्यात आला.

जाहिरात

यावेळी आ. आशुतोष काळे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना मतदारसंघातील सगळ्याच रस्त्यांची कामे एकामाघे एक पूर्ण करणार आहे. पाणी आणि विजेच्या समस्यांवर जातीने लक्ष देऊन काम करीत असून नागरिकांनी काही समस्या असतील तर सांगा. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही. नागरिकांच्या मागणीनुसार कामे करून गावा-गावात समृद्धता आणण्यासाठी कार्य करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे